Sunday 28 November 2021

कारण मी मोठा झालो आहे...

 



नोकरीला एव्हाना वीस वर्ष पूर्ण होत आहेत
कामाविषयीकुठलीहीकसलीही काडीची ही तक्रार नाही
नीटनेटकेपणाप्रामाणिकपणासमय पालन या सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर करतो
म्हणूनच मी कोणाचेही ऐकून घेत नाही
अगदीच वेळ पडली तर साहेबांनाही ऐकवतो
कारण मी मोठा झालो आहे...

आई-बाबा आता खूप थकले आहेत
पण तरीही ते दोघंही आज माझंच ऐकतात
त्यांच कामही माझ्याप्रमाणेच पक्क होतं
पण मि सांगितलेल्या गोष्टी त्यांनाही मान्य असतात
माझ्या सल्ल्याशिवाय ते कोणतेही पाऊल उचलत नाही
घरामधे माझाच शब्द अंतिम ठरतो
कारण मी मोठा झालो आहे...

मुलांचा आणि बायकोचा तर प्रश्नच नाही
बायको घरात असते मुलाबाळांची काळजी घेते
पण मी सांगितल्याशिवाय अगदी किरणा सुद्धा आणत नाही
भाजीकपडेविकत घेण्याच्या वस्तू या सगळ्यांची जागा मी ठरवतो
कारण मला अधिक कळतं
मी बाहेरच जग जास्त पाहिले आहे
म्हणून घरात माझाच शब्द चालतो
कारण मी मोठा झालो आहे...

मित्रांशीही भेटणं बऱ्यापैकी होतं प्रत्येकजण वेगळ्या हुद्या वरती आहेत
पण माझा स्तर त्यांच्या पेक्षा काही वेगळाच आहे
म्हणून माझ्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांची गाडी पुढे सरकत नाही
अगदी बारीकसारीक गोष्ट मी स्पष्ट करून सांगतो
नव्हे तसा माझा हातखंडा आहे
माझ्यासारखं विषय ज्ञान खरंच कुणाचा नाही
कारण मी मोठा झालो आहे...

प्रत्येक नातेवाईकाकडे कार्य प्रसंगाला मी न चुकता जातो 
अगदी वाढदिवस ते लग्नकार्य मी एका एका आमंत्रण मध्येच पूर्ण करतो
म्हणून माझ्या घरी कुणी चुकूनही नाही आलं
तर त्याला झापायला मी कमी करत नाही
कारण माझा मान तर राखला गेलाच पाहिजे
हा माझा अहंकार नसून अभिमान आहे,
हे देखिल मलाच कळतं 
कारण मी मोठा झालो आहे...

परवा मी माझ्या मोठ्या मुलाला धाकट्या बहिणीला झापताना पाहिलं
आणि पहिल्यांदा जाणवलं की,
आता हा पण मोठा होणार...
आता या क्षणाला मी त्याला समजावयचा प्रयत्न केला नाही
माझ्याच कृतीत बदल करायचं ठरवलं
आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागलो
आणि लक्षात आलं की,
छोटं राहण्यातला आनंद खूप मोठा आहे...
हे उमगायला, मला खूप मोठी किंमत मोजावी लागली
पण आजवर मला सहन केलेल्या सगळ्यांची मी माफी मागणार आहे
ते देतील ती शिक्षा भोगणार आहे,
अगदी कर्तृत्वाचा डंका कुठेही न बडवता
आपुलकीचा आणि मायेचा ओलावा छोट्या-छोट्या क्षणात भरणार आहे
कारण मी आता मनाने मोठा झालो आहे...


©हेमंत पोहनेरकर

9 comments:

satish karlekar said...

फारच सुंदर हेमंत!👍💐

Unknown said...

अतिशय सुंदर सत्य ...

सुहास सुपेकर said...

खूपच सुंदर आणि वास्तविक

Unknown said...


छान आहे


SANDEEPmPATIL10 said...

खूप छान वर्णन केले आहे.

वृंदा देशपांडे-जोशी said...

सुरेख! अनुभव हाच गुरू!

Unknown said...

Khup chan ahe sir and true


Unknown said...

Agadi mana la bhavel ashi hee tumchi apratim
Kavita .....khup chhan hemant sir..❤️

हेमंत पोहनेरकर said...

मन:पूर्वक धन्यवाद

सासुरवाशीन

अलक

 तो : वरकरणी पहिलं प्रेम दुसरं प्रेम असं काही नसतच, असतं ते एक मात्र लग्न. ती : ‘संलग्न’ एव्हढे जरी तुला कळले असते तरी बरे झाले असते.