Sunday, 18 June 2023

अलक

त्याला एक सुंदर कविता सुचली. त्याने खिशातील कागद बाहेर काढला तर त्यावर किरणासमानची यादी होती.

सुचलेली कविता बाजूला ठेवून त्याने नवी कथा लिहायला घेतली नाव दिले ‘संसार’.

Tuesday, 13 June 2023

अलक

‘पत्रकारिते’वर काही तरी लिहा असे एकदा त्याला सांगण्यात आले.

ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही, त्यावर लिहिण्यासाठी त्याचे मन तयार होत नव्हते.

शेवटी त्याने चार-ओळी लिहून पाठवल्या.

आता त्याला पत्रकारही ‘चतुरंग साहित्यिक’ म्हणून संबोधायला लागले.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...