‘जय फिलिस्तीन’ म्हणून एका मंत्री महोदयांनी संसदेत शपथ घेतली.
एव्हाना ‘वंदे मातरम’ हे सांप्रदायिकात वाढवणारे आहे,
अशी म्हणणारी मानवतावादी, धर्मनिरपेक्ष मंडळी त्यांच्या कामात व्यस्त होती.
‘जय फिलिस्तीन’ म्हणून एका मंत्री महोदयांनी संसदेत शपथ घेतली.
एव्हाना ‘वंदे मातरम’ हे सांप्रदायिकात वाढवणारे आहे,
अशी म्हणणारी मानवतावादी, धर्मनिरपेक्ष मंडळी त्यांच्या कामात व्यस्त होती.
त्यांनी ‘प्रयोपवेशन’ घेण्याचा निर्णय जाहीर केला. घरातील सर्वांवर जणू आभाळाचं कोसळले.
‘न्यायालय प्रयोपवेशनास अनुमती देत नाही’, त्यांच्या मुलांनी कळवळून मुद्दा मांडला.
ते अविचल राहिले.
एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते, ‘त्यांनी संपूर्ण जीवनच न्यायदेवतेला साक्षी ठेवून व्यतीत केले होते.’
ती त्याची बेकेट लिस्ट पाहून म्हणाली, “एव्हढी मोठी बकेट लिस्ट कधीच नसते!”
तो शांतच राहिला.
तिने पुन्हा ती बकेट लिस्ट पाहिली.
ती त्याने स्वतःसाठी घरातील सगळ्यांची एकत्रित केलेली बकेट लिस्ट होती.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...