Sunday, 29 October 2023

अलक

 

‘डबा खाल्ला का? चहा केव्हा घेतला? कंपनीत केव्हा पोहंचलात? आता कुठे आहात? एव्हढा उशीर का?’

 - असे दिवसभरात, ती त्याला किमान पाच-सहा तरी फोन करायची.

परंतू तो प्रचंड संयमी असायचा.

एके दिवशी तो तिला म्हणाला,

“प्रेमाच्या अतिरेकाने त्रास झाला, अश्या जोडप्याचे उदाहरण आपण आपल्या मुलांसमोर ठेवलेले आवडेल का?”

अलक

 त्याची घरी येण्याची वेळ निश्चित असायची, परंतू तिचा एक फोन यायचाच. “केव्हा पोहंचताय”, असे म्हणून.

एके दिवशी काहीतरी वाटून ती त्याची क्षमा मागत होती.

त्यावर तो तिला म्हणाला,

“मला मुळीच त्रास होत नाही. उलट घरी कुणीतरी वाट पाहतंय, या जवाबदारीने लवकर पोहंचायचा प्रयत्न करत असतो.”




अलक


हॉस्पिटलमध्ये तिला नाईटड्यूटी मिळाली होती. 

तो तिला दोन-तीन तरी व्हिडीओकॉल करायचा.

तिच्या सगळे लक्षात येत होते.

पण एकेदिवशी न राहवून ती त्याला म्हणाली, 

“काळजी प्रेमाचा पाया असतो तर शंका अविश्वासाचा.” 

त्यानंतर मात्र त्याने तिला कधी साधाफोनही केला नाही.




Sunday, 22 October 2023

अलक




.

त्याने सदैव त्याच्या मुलावर बंधने घातलीपरंतु मुलीवर कधीही नाही.

मोठेपणी या गोष्टीची जाणीव झाल्यावर मुलगी म्हणाली, “बाबातुम्ही असा बंधनाचा फरक का केला?”

उत्तरादाखल तो म्हणाला, “बाळापुरुषाला ‘मर्यादापुरुषोत्तम’ होण्यासाठी आयुष्य खर्ची पाडावे लागतेपरंतु स्त्री जन्मजात ‘दुर्गा’ असतेम्हणून केवळ जाणीव करून देणेही पुरेसे असते.”


.

देवीचे दर्शन घेऊन तिने कुटुंबासाठी ‘धन,धान्यसुखसमृद्धी’ मागितली

मुलगी तिला म्हणाली, “आईतू स्वतःसाठी कधी काही मागितले आहेस का?”

होय,” स्मितहास्य करत ती म्हणाली, “समृद्ध आईपण.”


.

तिच्या नऊदिवसाच्या उपवासाचा उपहास केला जात होता.

उपेक्षा सहन  होऊन उत्तरादाखल ती म्हणाली,

तुमच्या प्रत्येकाच्या घराचा उंबरठा शिल्लक आहेतो याच कारणास्तव”.

Sunday, 8 October 2023

अलक


(*’अलक’मधील नवीन प्रयोग सादर करत आहे. आपला प्रतिसाद आणि सूचना यांच्या प्रतिक्षेत.* )


१.

लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.

त्याने लगोलग मुलांना बोलावून संपत्तीची वाटणी केली.

कोपऱ्यात बसून ती सर्व काही पाहत होती.

तिचा हात हातात घेत तो म्हणाला, “मी मुलांना सगळंकाही दिलेले आहे.”


२.

लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.

अजून कर्तृत्वाचा काळ तसा शिल्लक होता.

परंतु त्याने निवृत्ती जाहीर केली.

आता लोक त्याचा ‘आख्यायिका’ म्हणून संदर्भ देत असतात.


३.

लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.

सूर्यास्त समीप आला आहे, हे त्याने जाणले.

नि पुढच्याच क्षणी त्याने प्रारब्ध, प्राक्तन यांचा विचार सोडून प्रयत्न, प्रवास यावर भर देण्यास सुरुवात केली.


Sunday, 1 October 2023

अलक

 

अवतरण चिन्ह.

त्याने त्याच्या आत्मचरित्राला नाव दिले.

प्रकाशनानंतर काही दिवसातच विक्रमी खप झाला.

त्याच्या पुस्तकावर समीक्षा प्रसिद्ध झाली.

शिर्षक होते, “मी.परफेक्शनिस्ट.”

अलक

 

मादी कासव तिच्या नवजात अर्भकाची भूक डोळ्यांतून भागवते, हे कळल्यानंतर तो प्रचंड भावविभोर झाला.

नि लगोलग त्याच्या ‘विशेष मुला’ला बोर्डिंग स्कूल मधून नेहमीसाठीच घरी आणण्यासाठी निघून गेला

अलक



प्रबोधन हा त्याचा आवडीचा विषय. आणि उत्कृष्ट वक्तृत्वातून तो ते नेहमीच साध्य करायचा.

पुढे चालून त्याने एक सेवाभावी संस्था सुरू केली.

“वक्तृत्व सोडून सेवाकार्याकडे का वळले?”, 

या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला,

“आधुनिकयुगाचा नवा मंत्र जपायचा यत्न करतो आहे. ‘मरावे परी कार्य रूपी उरावे’”.



सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...