१.
त्याने सदैव त्याच्या मुलावर बंधने घातली. परंतु मुलीवर कधीही नाही.
मोठेपणी या गोष्टीची जाणीव झाल्यावर मुलगी म्हणाली, “बाबा, तुम्ही असा बंधनाचा फरक का केला?”
उत्तरादाखल तो म्हणाला, “बाळा, पुरुषाला ‘मर्यादापुरुषोत्तम’ होण्यासाठी आयुष्य खर्ची पाडावे लागते. परंतु स्त्री जन्मजात ‘दुर्गा’ असते, म्हणून केवळ जाणीव करून देणेही पुरेसे असते.”
२.
देवीचे दर्शन घेऊन तिने कुटुंबासाठी ‘धन,धान्य, सुख, समृद्धी’ मागितली.
मुलगी तिला म्हणाली, “आई, तू स्वतःसाठी कधी काही मागितले आहेस का?”
“होय,” स्मितहास्य करत ती म्हणाली, “समृद्ध आईपण.”
३.
तिच्या नऊदिवसाच्या उपवासाचा उपहास केला जात होता.
उपेक्षा सहन न होऊन उत्तरादाखल ती म्हणाली,
“तुमच्या प्रत्येकाच्या घराचा उंबरठा शिल्लक आहे, तो याच कारणास्तव”.

No comments:
Post a Comment