(*’अलक’मधील नवीन प्रयोग सादर करत आहे. आपला प्रतिसाद आणि सूचना यांच्या प्रतिक्षेत.* )
१.
लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.
त्याने लगोलग मुलांना बोलावून संपत्तीची वाटणी केली.
कोपऱ्यात बसून ती सर्व काही पाहत होती.
तिचा हात हातात घेत तो म्हणाला, “मी मुलांना सगळंकाही दिलेले आहे.”
२.
लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.
अजून कर्तृत्वाचा काळ तसा शिल्लक होता.
परंतु त्याने निवृत्ती जाहीर केली.
आता लोक त्याचा ‘आख्यायिका’ म्हणून संदर्भ देत असतात.
३.
लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.
सूर्यास्त समीप आला आहे, हे त्याने जाणले.
नि पुढच्याच क्षणी त्याने प्रारब्ध, प्राक्तन यांचा विचार सोडून प्रयत्न, प्रवास यावर भर देण्यास सुरुवात केली.
No comments:
Post a Comment