Sunday, 7 April 2024

अलक

 तो : वरकरणी पहिलं प्रेम दुसरं प्रेम असं काही नसतच, असतं ते एक मात्र लग्न.

ती : ‘संलग्न’ एव्हढे जरी तुला कळले असते तरी बरे झाले असते.

अलक

 ‘पहिलं प्रेम’, ती नवऱ्याला माझी ओळख करून देत म्हणाली.

नि मला तिच्यासाठी लिहिलेल्या सगळ्या कविता आठवल्या.

तिने माझा भिडस्तपणा ठेचला होता.

एव्हाना काव्याचा अंतिम आधार घेत, मी पुटपुटलो, ‘न वरा’.

अलक



कॉलेज मध्ये असतांना एक मुलगी आवडली होती. तो काळ असा होता की, प्रपोज करायचे धाडसच झाले नाही.

पण कशी का होईना तिला चाहूल लागलीच.

तिने बेंचवर लिहून ठेवले होते, ‘पाहिलं प्रेम‘ आणि त्यावर फुली मारली होती.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...