Sunday, 21 February 2021

आजी-आजोबा



 धर्म

आजीचे सातत्याने चालणारे उपवास पाहून एके दिवशी, गहिवरून नात आजीला म्हणाली, " आजी किती गं उपास-तापास करशील, अजून किती पुण्य मिळवशील?"

आजी म्हणाली, "नाही गं पोरी, पुण्य मिळवण्यासाठी नाही करत."

"मग!", नातीला आश्चर्य वाटलं.

" 'मोहापेक्षा त्यागातच खरा धर्म आहे', ते अनुभवण्यासाठी करते, एवढंच..."

सोबती

'सवाष्ण म्हणून मृत्यु येण्याची इच्छा', आजीने अनेकदा बोलून दाखवली होती.

तशी आजी एके दिवशी सवाष्ण म्हणून जात राहिली, आणि लगोलग काही तासांतच आजोबाही निर्वतले.

कारण त्यांनी ही देवाकडे साकडं घातलं होतं, 'ती माझी आयुष्यभराची 'सोबती' आहे, मृत्युनंतर तिला एकटं नको ठेवुस...'

सनातन

"आजोबा तुम्ही खूप भारी आहात. आमच्या पिढी सोबत तुम्ही जुळवून घेतलं. डिजिटल गोष्टी स्वीकारल्या आणि जुन्या वळणाच्या पण वाटत नाहीत"

" बाळा, कारण आम्ही 'सनातनधर्मा' प्रमाणे जगणारे आहोत."

"म्हणजे"

" म्हणजे जुन्याला जोपसत, नित्य नवे, नूतन बदल स्वीकारत पुढे जाणारे...."


आदर्श

आजोबा आणि आजीच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस नातवांनी खुपच उत्साहाने, आनंदाने साजरा केला.

मनोगत व्यक्त करताना आजोबा म्हणाले, " तुमची नवी पिढीदेखील आमच्या पिढीने जोपासलेली संस्कृती निश्चितच संभाळणार.

कारण, भलेही तुम्हाला एकीकडे लिव्ह इन रिलेशनशिप चे आकर्षण असेल. पण तुम्ही 'आदर्श' नेहमीच आमच्या पिढीचा बाळगता..."

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...