Thursday, 10 January 2019

उन्हातलं घर



‘खोड्या करू नकोसनाही तर तुझं घर उन्हात बांधेन’बहुधा हे वाक्य सर्वांनीच आपल्या बालपणी ऐकलेलं आहे.


पण पूर्णतः नकळतं वय ते. खेळणंखोड्या करणे हेच एकमेव काम. केलेल्या खोड्यांनाशिक्षा होतेहे कमीअधिक प्रमाणात समजलेलं. पण ‘उन्हात घर बांधेन’ या वाक्या मागे किती मोठी शिक्षा असेल याची तसूभरही कल्पना नसायची.


तसे पाहता खोड्या करणे हा लहान मुलांचा मुलभूत अधिकारच. पण एका छोट्याश्या गुन्ह्याला एवढी मोठी शिक्षा !


अपेक्षांची प्रखर किरणं तेंव्हा जीवनात पोहंचलेली नव्हती. परंतू उगवतीच्या सूर्यनारायणापेक्षा दुपारचे सूर्यदेव कुणीतरी वेगळे असतातहे हलकसं कळायला लागलं होतं.

परिस्थितीचे चटके कळावेतहे ही ते वय नव्हतं. परंतू काहीतरी टाळलं पाहिजेहे नक्की उमगलेलं.


अजाण मन आणि गोड खोड्या एवढंच काय ते समीकरण असायचंबालपणीचं.


या सुखाच्या काळातील आठवणींनी आजही मन भरून येतं. आपणच केलेल्या खोड्यांवर हसूही येतं.


पण आता खोड्या होत नाहीततरीही ‘घर उन्हात’ आहे.


बहुधा सावलीची जागा आपण खूप मागे सोडली आहे. एखादा छोटासा आडोसा जरी मिळाला तरी बरं वाटतं. परंतू आता उन्हातलं घर सोडताही येत नाही.


कोवळ्या उन्हात कोवळ बालपण नक्कीच हरवलंय. ते रोज सकाळी शोधायचा प्रयत्नही होतो. पण नंतर जाणिव होते कीआपल्याला तर भर उन्हासोबत संसार करायचा आहे. म्हणून व्यावहारिक जगात मनाला थोडंस बाजूला ठेवून बुद्धीच ऐकावं लागतं. भावनांची घालमेल होत असतेच.  पण तर्क मात्र सुसंगतपणे सहजपणे जिंकत जात असतो.


म्हणूनच की काय एक छानशी सावली मिळावी म्हणून अंगणात आता एका आनंदाचं झाड लावीन म्हणतो.

हे ठाऊक आहे की, आज मला त्याची सावली लागेचच मिळणार नाही. पण पुढच्या पिढीसाठी काही तरतूद हवी ना.

ते ही खोड्या करणार आहेतच आणि त्यांनाही वास्तवाला सामोरं जायचं आहे. खोड्या न करताही भोगावी लागणारी शिक्षा त्यांच्याही वाट्याला कदाचित येईण.


हे आनंदच झाड लावताना त्यांच्या वाट्याला वाराश्यामधे उन्हातलं घर नको आणि ‘खोड्या केल्या तर तुझं घर उन्हात बांधेण’ हे वाक्यही नको.


©हेमंत विनोद पोहनेरकर


सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...