Sunday, 3 September 2023

'मिली-जुली संस्कृती?'


शेवटच्या परकीय गुलामगिरीतून मुक्त होऊन एव्हाना आपल्याला ७६ वर्षांचा कालावधी उलटून गेला. आणि त्याचा स्वातंत्र्य उत्सव देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला. सर्वच जाती-पंथ-संप्रदाय या साऱ्यांच्या सीमा उल्लंघून आपण स्वातंत्र्य उत्सव खूप उत्साहात साजरा केला. इंग्रंजांचे राज्य असो वा गेल्या १००० वर्षात आजपर्यंत आपल्यावर अनेक परकीय आक्रमकानी सत्ता्ता गाजवल्या. परंतु तरीही आपण आपली हिन्दु संस्कृती टिकवून ठेवली आहे.

'ग्रीक, युनान, मिस्रा सब मिट गये जहासे, कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी...' या प्रसिद्ध ओळी आपल्याला माहित आहेतच. अर्थात ती 'कुछबात' म्हणजे काही खूप मोठी गुप्त अवस्था किंवा गुपित अशी गोष्ट निश्चितच नाही. भारतीय साधु-संतांनी जगाला दिलेली ती एक वैश्विक देण आहे. 

सहिष्णुता, अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम, माता भुमी पुत्रोहं पृथिव्या, यासारख्या अनेक जीवनमूल्यंवर आपली संस्कृती टिकून आहे. आणि अर्थातच ही टिकवण्याचं काम पिढ्यान पिढ्या साधु-संतांनी ज्याप्रमाणे केलं. तसंच सामान्य माणसांनी गृहस्थाश्रमाचे पालन करत असताना मोठ्या प्रमाणात ही जीवनमूल्य जपली. म्हणूनच आपली हिंदूसंस्कृती अनादी काळापासून टिकून आहे आणि ती अनादी काळापर्यंत टिकुन राहील, हा देखील विश्वास आहेच.

शिवाय सहिष्णुता म्हणत असताना जगभरात जेंव्हा अन्य देशातील नागरिकांवर अत्याचार आणि अनाचार होत होते.  त्यावेळेला भारतानेच जगातील अशा अनेक लोकांना आश्रय दिलेला आहे. येहुदी, पारसी ही त्यातील सगळ्यात मोठी उदाहरणे. केवळ आश्रयच दिला असे नाही तर त्यांना त्यांच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देखील दिले. अर्थात एक हिंदू म्हणून आपण आपले जीवनमूल्यच जपत होतो. 

आणि असे यहुदी, पारसी स्वतःचे पंथ संप्रदाय आणि देवी देवतांचे पूजन करत असताना आपल्या संस्कृतीत केव्हा मिसळून गेले हे कळाले देखील नाही. परंतु 'राष्ट्रीय काँग्रेस' आणि 'मुस्लिम लीग'च्या स्थापनेनंतर मात्र एक नवीन संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला गेला.  ती संकल्पना म्हणजेच 'मिली-जुली संस्कृती'.

इंग्रजांच्या 'फोडा आणि राज्य करा' या धोरणाचे आपण बळी पडलो.  'मिली-जुली संस्कृती' अर्थात भारत हा एक मिश्र अशा संस्कृतीचा देश आहे, हे आपल्या मनावर बिंबवण्यात आले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. परंतु त्यांच्या विविधतेत एकता नाही. तर एकतेत वैविध्य आहे. आणि म्हणूनच आजवरच्या हजारो वर्षांच्या आक्रमणामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्या देशाला काही वर्षांच्या कालावधीमध्येच 'मिली-जुली संस्कृती' म्हणून संबोधले जाते, ही एक अत्यंत विकृत मांडणी आहे. 

खरे तर गंगा उगमापासून सागराला मिळेपर्यंत गंगाच असते. गंगेच्या प्रवाहामध्ये गंगेला अनेक नद्या येऊन मिळतात.  भागीरथी, अलकनंदा, यमुना, घागरा, गोमती, शोण या सगळ्या नद्या गंगेच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट होतात.  आणि गंगामय होऊन सागराला मिळतात.  गंगा ही शेवटपर्यंत गंगाच राहते.  तद्वतच हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आहे. वेगवेगळया पूजा उपासना पध्दती असल्या तरी हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदूच आहेत. आणि ही हिंदू संस्कृती अशा सर्वांचीच आहे. 


खरे तर 'सहिष्णुता' हा शब्दच भारताने जगाला दिला.  तीच सहिष्णुता आता भारताला इतर देश  शिकवू पाहतात हीच मोठी आश्चर्याची बाब आहे. आज भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपण अमेरिका, चीन, जपान आदी प्रगत देशांमधून बोलू देखील शकत नाहीत. परंतु भारतामध्ये सगळ्याच गोष्टींचा मतांचा आदर करत असल्यामुळे की काय आपण ते देखील स्वीकारतो.  आणि नकळतपणे कुठे ने कुठेतरी स्वतःला हरवून  घेतो. 

परंतु आता राजकीय आणि अशा तथाकथित लोकांना देखील या गोष्टीची जाणीव होत आहेत की आपले पूर्वज देखील हिंदूच होते. याचं राजकीय उदाहरण म्हणजे गुलाम-नबी आजाद. त्यांनी देखील मान्य केले आहे की, 'अनेक वर्षांपूर्वी आमचे पूर्वज हे हिंदूच होते'. अर्थातच हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदू आहेत आणि म्हणूनच हिंदुस्थानात राहणारा कुणीही 'अल्पसंख्य' नाही. 

हिंदू संस्कृती ही एक आदर्श जीवनमूल्य जपणारी एक आदर्श अशी जीवनशैली आहे, असा स्पष्ट उल्लेख सर्वोच्च न्यायालयानेच केला आहे. त्यामुळे हिंदू जीवनमूल्य जपणे, वृद्धिंगत करणे हे समग्र मानव जातीच्या हिताचे आहे. जीवनमूल्य या गोष्टीचा उल्लेख अनेक वेळेला उल्लेख झाला, त्याचा समारोप करत असताना उदाहरण सांगायचे झाले तर ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांचे सांगता येईल. वडिलांनी आईला दिलेले वचन पाळण्यासाठी पुत्र १४ वर्षांचा वनवास  स्वीकारतो. आणि दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी भावाची हत्या करुन वडिलांना तुरुंगात टाकून आपण स्वतः राजा होणारा औरंगजेब, अशी जीवनमूल्य जगणारे आपल्या संस्कृतीचा भाग होऊच शकत नाही.
तर जगाला शांती शिकवणारे भगवान बुद्ध, अहिंसा शिकणारे भगवान महावीर, धर्म रक्षणार्थ सर्वस्वाचे बलिदान करणारे समस्त शिख गुरु, नि भक्तीचा झेंडा जगभर नेणारी समस्त संत महंत मंडळी, अशी अनेक जीवन मूल्य जगाला देणारी हिंदू संस्कृती 'मिली-जुली' असू शकत नाही.  
ती हिंदू संस्कृती होती आणि हिंदू संस्कृतीचं राहील.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


4 comments:

vivek9 said...

👍

हेमंत पोहनेरकर said...

Thanks a lot Vivekji

Parag Sabnis said...

अगदी खरं आहे ...जे मूळ आहेवते मूळ राहणारच ..त्यात भेसळ होऊ शकत नाही कितीही मिली जुली गंगा जमुनी म्हणायचं प्रयत्न केला तरी....मस्त लिखाण झाले आहे

हेमंत पोहनेरकर said...

धन्यवाद परागराव.

‘गंगा-जमुना तहजीब’ असे काही असूच शकत नाही.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...