Sunday, 31 March 2024

अलक


१.

तो ‘मल्हार’ नावाने काव्य रचायचा.

अर्थातच स्वतःची जगाला कधी ओळख होऊ दिली नाही.

त्याने ‘आयुष्याच्या संध्याकाळी’ या काव्यात नमूद केले ‘माता-पित्यांनी त्याला ‘मल्हारी-म्हाळसाकांता’च्या चरणी वाहिले होते’.


२.

त्याने आजवर लिहिलेल्या कविता मोजायला सुरुवात केली. त्याने हजारी गाठल्याचे लक्षात आल्यावर मोजणी सोडली.

आणि ‘अनंता’ची कविता लिहिली.


३.

ती कवयित्री होती.

तो : मला कधी कधी मला तुझ्या कविता नाही कळत.

तिने त्याला ‘स्त्रीमन’ न उलागडाता आल्यामुळे क्षमा केले.


©हेमंत पोहनेरकर

९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...