Sunday, 31 October 2021
चौथी मूलभूत गरज
Sunday, 24 October 2021
आत्मविस्मृती
'अग्निपंख' या आपल्या आत्मचरित्रात डॉ.अब्दुल कलाम यांनी एक प्रसंग वर्णन केलेला आहे. अमेरिकेतील नासाच्या मुख्य सेंटरला ते भेट द्यायला गेलेले असतात त्याच वेळेला वर्जिनीयातील नासाच्या अन्य एका सेंटरला देखील ते भेट द्यायला जातात. आणि त्या सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर स्वागतकक्षाच्या मागे एक युद्धाचे रेखाटलेले चित्र त्यांचे लक्ष वेधून घेते. त्या चित्राकडे थांबून पहाण्याचे कारण म्हणजे त्या चित्रातील युद्धात असलेला क्षेपणास्त्राचा प्रसंग. आणि क्षेपणास्त्र चालवणारे सैनिक 'गोरे' नाही आहेत. 'सावळे' आहेत. पुढे विचारपूस केल्यानंतर त्यांना कळतं, जगातली ही पहिली युद्धाची घटना होती ज्यात भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध करत असताना क्षेपणास्त्राचा प्रयोग केला होता. टिपू सुलतानच्या एका सेनापतीने असे महान कार्य केले होते. बरे झाले. डॉ.अब्दुल कलाम यांनी हा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला. नाही तर हाच उल्लेख अन्य एखाद्या भारतीयानी केला असता तर पुराणातली कथा म्हणून त्यास हिणवण्यात आले असते.
Sunday, 17 October 2021
मला तुम्ही आवडत नाहीत...
Sunday, 3 October 2021
जया अंगी मोठेपणा...
...तया प्रसिद्धी भरपूर".
परंतु या सगळ्या प्रकाराणावर सहज दृष्टी टाकली तरी कळून येते, ती म्हणजे 'कर्तव्यशून्यता'. आणि तरीही हवा हवासा वाटणारा 'मोठेपणा'. कारण एकदा का हा 'मोठेपणा' आला की, त्या मागोमाग 'प्रसिद्धी' अगदी अपोआप येते.
मूळात कर्तुत्व नसेल आणि तरीही नावलौकिक व्हावा असे वाटत असेल, तर 'मोठेपणा'चा मार्ग अगदी सोईचा असतो. मग त्या करिता नको नको ती आश्वासने, नको नको त्या बढाया आणि नको नको त्या फुशारक्या माराव्या लागतात. कारण विनासायास प्रसिद्धी हवी असते.
पूर्वी ब्रॅण्ड तयार व्हायला वर्षानुवर्षे लागायची. अपार कष्ट, चिकाटी, सचोटी, प्रामाणिकपणा इत्यादी सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक असायचा. तेव्हा कुठे एखादी गोष्ट नावारूपाला येत असे. परंतु आता 'काळ बदलला' असे म्हणणे अगदी स्वाभाविक आहे. खरंतरं 'बदल' ही एकमेव गोष्ट जगत शाश्वत आहे.
म्हणुनच 'मोठेपण'चा 'मोठेपणा' झाला.
आता आधी ब्रँड बनवला जातो. त्याची विश्वासार्हता अक्षरशः पटवली जाते. किंबहुना आपल्याला वेड्यात काढलं जातं.
'आप **** नही जानते?'
'अरे ये **** नही जानते?'
अशा आशयाच्या जाहिरातींमधून आपल्यावर त्या गोष्टीचा भडिमार केला जातो. मार्केटिंगचे हे तंत्र खरंतरं वस्तूंना लागू होते. पण बदत्या जगत आपण ते जीवनाच्या मंत्राला लावून घेतले आणि यंत्रवत झालो.
वर्तमानाचा डोलारा पेलणारा भूतकाळाचा पाया नाही आहे, म्हणून भविष्य दोलायमान झाले आहे. कदाचित असे भविष्य ज्ञान देखील असते. परंतु प्रसिद्धी या गोंडस आभासी दृश्य खाली अगदी ठरवून गाडले जाते.
म्हणतात ना, 'सुप्रसिद्धी' किंवा 'कुप्रसिद्धी' असे काही मूळी असतच नाही. असते ती केवळ प्रसिद्धी. आणि म्हणून ती प्रसिद्धी मिळवण्याकरिता पाहिजे त्या पद्धतीची नीती, रिती व स्थिती अवलंबिली जाते.
हिंदी मूळाक्षरांमधे आधी 'क' अक्षर येते व नंतर 'ख'. अर्थात हिंदी भाषिक विशेष करुन या गोष्टीचा उल्लेख या करिता करत असतात की, पहिले 'क'माओ फिर 'खा'ओ.
परंतु जिथे सातत्याने चर्चेत राहणे हेच उद्दिष्ट असते, तिथे स्वकष्टाचा आणि स्वकमाईचा मार्गही शॉर्टकटनेच मिळवण्याचा प्रयत्न होतो. आणि तोच 'मोठेपणा'चा मार्ग असतो.
जगद्गुरू संत तुकोबारायांनी 'जया अंगी 'मोठेपण', तया यातना कठीण', असे त्यांच्या अभंगात लिहून ठेवले आहे. सबंध विश्वाला कष्टाची जाणीव तर आहेच पण प्रसंगी कष्ट करून कधी अवहेलना ही सहन करण्याचा प्रसंग ओढवेल, याची जणू पूर्वसूचनाच दिली आहे. आणि बहुदा पूर्वीचा तो आपल्या समाजाचा स्वभावही होता.
परंतु आता सातत्याने 'ट्रेन्डीँग' राहण्याकरिता काही ना काही तरी सुरूच ठेवावे लागेल ना. मग चारचौघात फिरत असताना तसा अभिनिवेष बाळगला जातो. अभ्यासाच्या बैठकीची जागा आता 'मोठेपणा'चा अधिक आभास, या गोष्टीच्या अभ्यासाने अधिक घेतली आहे. आणि एकदा का मोठेपणाचा हा स्वभाव झाला की तो चित्त स्थिर कसे ठेवू देईल? मोठेपणाला ओढ प्रसिद्धीची असते.
नव्हे मोठेपणाच्या अस्तित्वातच प्रसिद्धी असते. ती दोघे एकत्र नांदत असतात. म्हणून क्वचित प्रसंगी जर कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं, चारचौघात आपल्याला विचारलं गेलं नाही की, अक्षरश: होणारा त्रास हा 'जीवन संपले' इतका भयावह असतो.
'मोठेपणा'च्या डोळ्यांवरील आलेल्या झापडांमूळे पूढचे काही दिसत नाही. मग लक्ष वेधून घेण्यासाठी अगदी किळसवाणी वाटावी अशी कृत्ये केली जातात. कारण कुणी विचारलं नाही तर मग पर्यायच नसतो ना. गेले काही दिवस प्रसिद्धीच्या झोतात मध्ये नाही ही भावनाच विषारी आहे.
पु. ल.देशपांडेनी सांगितलेलं 'पोकळी'चं वाक्य आता वाटतं केवळ संग्रहालयात ठेवण्यात योग्य झाले आहे. कारण शब्दाला लागलेला केवळ एक काना अर्थाकडून अनर्थाकडे घेऊन जात आहे. मुंगी होऊन साखर खाण्यात धन्यता मानण्याऐवजी, मोठेपणा मिळवण्यात जास्त सुख मानले जात आहे, हे प्रसिद्धीच्या जगातील दाहक सत्य झाले आहे. या सत्यापासून आपल्याला तुर्तास तरी दूर जाता येणार नाही.
'जया अंगी 'मोठेपणा'...
...तया प्रसिद्धी भरपूर'.
सासुरवाशीन
अलक ५७८
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
-
शेवटच्या परकीय गुलामगिरीतून मुक्त होऊन एव्हाना आपल्याला ७६ वर्षांचा कालावधी उलटून गेला. आणि त्याचा स्वातंत्र्य उत्सव देखील आपण मोठ्या प्रमाण...
-
'स्वीकारणे' हा अमूल्य असा दागिना अंगावर परिधान करुन, ती माप ओलांडून माझ्या घरात आली. अर्थात माझी सौभाग्यवती, बायको. बाबांच्या घरचे ...
-
नास्तिकाला ही दैवत असते ते मातेचे. कृतज्ञतेची कृतार्थता प्रकट करण्याचे एकमेव ठिकाण जगाच्या पाठीवर भगवंतानंतर अस्तित्वात आहे ते म्हणजे माता. ...