त्याचे ठाम मत होते ‘सगळे राजकारणी भ्रष्टाचारी आहेत’.
म्हणून त्याने कधीही मतदान केले नाही.
त्याला हे कधीही उमगले नाही की,
समाजातील सज्जनशक्ती मतदान करत नाही म्हणून योग्य व्यक्ती निवडून येत नाही.
त्याचे ठाम मत होते ‘सगळे राजकारणी भ्रष्टाचारी आहेत’.
म्हणून त्याने कधीही मतदान केले नाही.
त्याला हे कधीही उमगले नाही की,
समाजातील सज्जनशक्ती मतदान करत नाही म्हणून योग्य व्यक्ती निवडून येत नाही.
तो ‘नवतरुणांचा मतदानांतील सहभाग’ या विषयाचा अभ्यास करत होता.
त्याने एकदंरीत सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून विषय बदलला.
आता तो नव्या विषयाचा अभ्यास करतो आहे,
‘नवतरुणांचा निवडणुकीतील सहभाग’.
“भाषा तीन प्रकारच्या असतात”, तो विद्यार्थ्यांना शिकवत होता.
“पहिली. शब्दांची भाषा”, म्हणत तो वर्णन करू लागला.
त्याची देहबोली आणि डोळ्यांतील भाव पाहून विद्यार्थ्यांना भाषेचे इतर दोन प्रकार देखिल कळाले.
लोकं दोन-पाच वर्षांच्या कार्यकाळातच स्वतःच्या कामाचा संदर्भ द्यायला लागतात.
त्यांनी मात्र चाळीस वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करत असतांना असा अभिनिवेश कधीही बाळगला नाही.
निवृत्तीनंतर आत्मचरित्र प्रकाशित केले.
शिर्षक होते ‘प्र-योगी’.
‘…संत तेथे विवेका असणे की जे’, शिक्षक दृष्टांत अलंकार शिकवत होते.
काही विद्यार्थ्यांना समजला नाही. तेंव्हा त्यांनी परत एक दृष्टांत दिला. आणि असेच पाच-सात वेळेला झाले.
तरीही ते तितक्याच शांतपणे शिकवत होते.
ते पाहून शिक्षकांकडे एक विद्यार्थी पुटपुटला ‘संत तेथे विवेका’.
त्याचा नित्य मद्यसेवनाने मृत्यू झाला.
एव्हाना कोणत्याही गोष्टीतील ‘सातत्य’ मनुष्याला अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाते,
या गोष्टीची प्रचिती त्याच्या मित्रांना आली होती.
त्याने तिला वाढदिवसाची भेट म्हणून ‘पैठणी’ दिली.
मोरांनी पिसारा फुलवून नाचावे तसे काहीसे झाले. नि ती क्षणभर थांबली.
पैठणी मिळाल्याचा आनंद होताच.
परंतू त्याने सर्वसामान्य परिस्थितीत केलेल्या नियोजनाने ती अधिक भारवली.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर काही धर्मांधांनी दगडफेक केली.
त्यावरही सामाजिक सलोखा हिंदुनीच जपला.
या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा हजारोंवर्षांच्या परंपरेची ‘पंथनिरपेक्षतेची’ प्रचिती सर्वांना दिली.
भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान-४ ची घोषणा केली. तर दुसरीकडे सामान्य भारतीय चतुर्थी, पौर्णिमा आणि अमावस्या यांचे पालन करत होते.
काही पुरोगामी मंडळींना हा विरोधाभास वाटत होता.
परंतू देवी-देवता देखील शस्त्र आणि शास्त्रचे पुरस्कर्ते आहेत, हे ते विसरले होते.
तिच्या तरुण मुलीने ढोल पथकांत सहभागी व्हायचा निर्णय घेतला.
तिनेही क्षणांत होकार दिला.
एव्हाना तिला कळून चुकले होते, ‘वडील नसलेली मुलगी परिस्थीतीशी दोन हात करण्यास सक्षम झाली आहे’.
तिच्या इटुकल्या लाडोबाने गणपतीच्या मिरवणुकीत खूप छान ढोल वाजवला.
त्याच्या ठोक्यावर तिचेही पाय थरकत होते.
ती त्याची संगीत विषयाची आवड ओळखत स्वतःशीच पुटपुटली ‘बाळाचे पाय पाळण्यात’.
एका शहरातील व्यापारीवर्ग जीवघेण्या स्पर्धेच्या युगांत एकत्र येऊन व्यवसायाची देवाणघेवाण करायचे.
अशक्य गोष्ट शक्य कशी झाली, याची पाहणी झाली, तेंव्हा लक्षात आले,
त्यांनी या कृतीला आध्यात्मिक अधिष्ठान देत ‘उद्योग मंत्र’ असे संबोधले होते.
शववाहिका चालकाने बराच वेळ गाडी चालवल्यानंतर रेडिओ सुरु केला.
गाणी वाजायला लागताच मृतव्यक्तीच्या नातेवाईकाला प्रचिती आली,
‘मनोरंजन ही चौथी मूलभूत गरज आहे’.
‘मृत्यू सोबत वैर संपत असतं’, त्याला हे विधान खोटे ठरवायचे होते.
म्हणून मग त्याने प्रत्येकाला क्षमा करण्यास सुरवात केली. त्याला आनंदही होत होता.
नि त्याने एका क्षणी शोध घेण्यास सुरुवात केली की, ‘त्याला कुणी क्षमा केली आहे का नाही?’
त्यावेळेस तो अधिक आनंदी झाला.
एका राजकीय नेत्याने परदेशात जाऊन भारत विरोधी वक्तव्य केले.
एव्हाना सगळ्यांना कळुन चुकले होते,
‘ते मूळ भारतीय नाही आहेत’.
ती महालक्ष्मी समोर ‘शांत मनाने’ हात जोडून उभी होती.
तिला ‘सुखप्राप्तीसाठी काय मागावे’, हे कळून चुकले होते.
वक्फ बोर्डाने एका संपूर्ण गावावरच दावा केला.
गावांतील नागरिकांवर क्षणांत बेघर होण्याची वेळ आली.
परंतू त्यांनी संयमाने जाती-पातीतील भेद विसरत ‘हिंदू’ म्हणून न्यायालयात धांव घेतली.
त्यांना प्रकरण जिंकल्यानंतर लक्षात आले, इथून पुढे आपली एकच ओळख असली पाहिजे.
ती महालक्ष्मीला वाण देत म्हणाली, “आता आयुष्यभराचा मुक्काम माझ्याच घरी कर”.
तिची भक्तीवर प्रसन्न होत महालक्ष्मी खरोखरच थांबली.
एव्हाना तिला कळून चुकले होते ‘चंचल व्यक्ती असते, लक्ष्मी नाही’.
“स्वप्न पाहावी. ती पूर्ण होत असतात”, पॅराऑलिम्पिक मधील एक सुवर्ण पदक विजेता संबोधित करत होता.
एव्हाना श्रोत्यांना परिस्थिती पुढे ‘हतबल होणे’ हा वाक्प्रचार खोटा वाटत होता.
तो नास्तिक होता.
परंतू त्याने एकदा तल्लीन होऊन आरती म्हणणाऱ्या काही भक्तांना पाहिले.
त्या दिवसांपासून त्याचा ‘आर्तभावने’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
‘नातू म्हणजे दुधावरची साय’, आजी त्याला लाडाने म्हणायची.
त्याला आजीची विशेष आठवण येण्याचे कारण म्हणजे आता तो ही बाप झाला होता. परंतू विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्याच्या मुलाला जीव लावायला आजी जवळ नव्हती.
‘अतित कोण’?, पोळ्याच्या दिवशी आईने त्याच्या डोक्यावर अक्षता टाकत प्रश्न विचारला.
‘मीच’, त्याने देखील प्रथेप्रमाणे उत्तर दिले.
आणि अंतर्मुख झाला.
एव्हाना त्याला एक लेखक म्हणून ‘कल्पनातीत’, ‘शब्दातीत’ विषयांसाठीचे उत्तर मिळाले होते.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...