Sunday, 13 August 2023

अलक

 ‘शून्य सावली’चा दिवस त्याच्या मुलाला खूप आवडला.

तो म्हणाला, “बाबा ‘शून्य वजना’चा दिवसही असतो का?”

विषय टाळत त्याचे बाबा निघून गेले.

नि पुटपुटले, ‘प्रत्यकाने जिवंतपणी ‘शून्य अस्तित्व दिवस’ही असू शकतो याचा विचार करून कार्य केले पाहिजे’.

अलक

 एका प्रसिद्ध कलावंताने कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर झाल्यानंतर आत्महत्या केली.

तत्पश्चात पत्नीने सगळी संपत्ती विकून आणि विम्याच्या आलेल्या रकमेतून कर्ज फेडले.

आता ती शासन दरबारी चकरा मारत आहे, ‘शालेय शिक्षणात ‘आर्थिक साक्षरता’ विषयाचा समावेश व्हावा म्हणून’.

अलक


एका मोठ्या साहित्यिकाया निधनानंतर त्यांच्या विषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.

त्यावर एक वाचक म्हणाला, “ ते ‘पोकळीच वाक्य’ या साठीच असतं असे वाटतं”.





Sunday, 6 August 2023

अलक


त्याच्या उच्चशिक्षित मुलाने संन्यासी होण्याचा निर्णय जाहीर केला.

त्याच्या पाया खालची जणू जमीनच सरकली.

तो स्वतःला नि पत्नीला सांभाळत म्हणाला, “हा आंनदाचा क्षण आहे. ‘ ‘संस्कार’ नुसता बोलण्याचा विषय नसून आचरणाचा भाग आहे’, हे तो सिद्ध करण्यासाठी जात आहे.”


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. ९५९५९६९९८९

अलक

 वडिलांचा एव्हढा धाक होता की, त्यांनी हाक मारली की तो ‘आलो’ म्हणत त्यांच्या समोर उभा ठाकायचा.

आता ही सवय त्याने देखील त्याच्या मुलांना लावली आहे.

‘आज्ञाधारकतेपेक्षा देखील आदर महत्त्वाचा’, हा जून्या पिढीचा संदेश, तो नव्यपिढीकडे हस्तांतरित करतो आहे.


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. ९५९५९६९९८९

अलक


फिरतीची नोकरी करताना तो बाहेर पडताना प्रत्येक वेळी आई वडिलांच्या पाया पडायचा.

कळत्या वयात आलेल्या त्याच्या मुलाने एकदा त्याला विचारले, “बाबा, तू नेहमीच बाहेरगावी जात असतोस. मग प्रत्येकवेळीच त्यांच्या आशीर्वादाची गरज असते का?”

“होय”, तो उत्तर देत म्हणाला, “आशीर्वाद. पण तो त्यांची अधिकाधिक सेवा करता यावी म्हणून.”


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. ९५९५९६९९८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...