तिच्या लाडोबाने शाळेतील कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही.
त्याचा संकोचाचा स्वभाव. तिला खूप वाईट वाटले.
तो तिला म्हणाला, "आई, काय करू, मला सगळ्यांमध्ये जाऊन काही करायला खूप भीती वाटते."
मग तिने त्याला श्यामची आई पुस्तकातील 'श्यामच्या पोहण्या'विषयीची गोष्ट त्याला सांगितली.