.
शाळेत बक्षीस वितरण झाले.
तिच्या इटुकल्या लाडोबाला एकही बक्षीस मिळाले नाही.
तो हिरमुसून गेला होता.
ती त्याच्या आवडीचे पेढे घेऊन घरी गेली.
घरी गेल्यावर त्याला म्हणाली, "आधी देवाला नैवद्य दाखव आणि मग सगळ्यांना वाट."
"पण आई", तो म्हणाला, "मला तर एकही बक्षीस मिळाले नाही."
त्यावर ती उत्तरली," तू प्रत्येक खेळांत भाग घेतलास ना, त्या साठी हे पेढे आहेत."
No comments:
Post a Comment