अशी सहजच पाहू नकोस मला
हृदय धडधडायला लागतं
पण तुला कसं कळणार
त्याला प्रेम असावं लागतं
सुखाची परिभाषा मजपाशी नाही
परंतू आनंदाची व्याप्ती आहे
म्हणूनच प्रत्येक क्षणांवर माझी
सारखीच भक्ती आहे...
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
अशी सहजच पाहू नकोस मला
हृदय धडधडायला लागतं
पण तुला कसं कळणार
त्याला प्रेम असावं लागतं
सुखाची परिभाषा मजपाशी नाही
परंतू आनंदाची व्याप्ती आहे
म्हणूनच प्रत्येक क्षणांवर माझी
सारखीच भक्ती आहे...
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
मुलगी झाल्यावर
ती म्हणाली,
"
'कृष्णा' नाव ठेवूया."
म्हणालो, " नको.
सरस्वती ठेवू."
तिने स्ववाभाविकपणेच
प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
आणि मी म्हणालो,
"असं समज,
तुझ्या नि माझ्या मनातील
सुप्त भावना जन्माला आली आहे."
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
'दुरून डोंगर साजरे', ही उक्ती आपणांस ठाऊक आहेच. पण तरीही एक मानसिकता असते, दूरवर दिसणारी हिरवळ अधिक सुंदर, मनमोहक आहे. प्रत्यक्षात तिथेही परिस्थिती फारशी वेगळी नसते. पण मन ही अशी गोष्ट आहे की, जी सदैव आशाळभूत असते.
आणि हीच गोष्ट आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत त्याच मानसिकतेची आहे. बहुतांश व्यक्तींना आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसायापेक्षा दुसरी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय हा अधिक खुणावत असतो. त्या दुसऱ्या नोकरी किंवा व्यवसाय मध्ये अधिक नफा आहे, अधिक संधी आहे, असे सातत्याने वाटत असते. आणि ते देखील सुरू असलेली वर्तमान नोकरी किंवा व्यवसाय करत असताना.
वर्तमान परिस्थितीत किंवा अधिक अधिक असलेल्या अपेक्षांचा जगात स्पर्धेत पुढे राहण्यासाठी, अधिक अधिक असलेल्या अपेक्षा, अधिक साधन संपत्ती मिळवण्यासाठी हे सर्व असू शकते. किंवा यापेक्षा वेगळे म्हणजे आपली इच्छाच वर्तमान नोकरी व्यवसाय करण्याची नसून दुसरे काहीतरी करण्याची आहे. अर्थात आपले कदाचित 'स्वप्न' अधिक काहीतरी वेगळे आहे! म्हणून दुसरी नोकरी दुसरा व्यवसायाचा मागे धावणारे अनेक जण असू शकतात, नवे असतीलही.
परंतु या थोडसा विपर्यास आहे. जर आपले स्वप्नच दुसरे काहीतरी आहे तर ते 'पार्ट-टाइम प्रयत्न' करून पूर्ण होईल? अर्थात या धावत्या जगात दुसरी नोकरी/ व्यवसाय करण्यास असा कितीसा वेळ मिळतो? जेणेकरून आपण ते स्वप्न पूर्ण करू शकू.
गरज भागवणे यापेक्षा अधिक काही दुसरी नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून होत नाही. कुण्या एका महापुरुषाने सांगून ठेवले आहे की, आपली आवड अर्थात आपली नोकरी वा व्यवसाय इतका वेडा होऊन केला पाहिजे की, आपल्याला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तीच गोष्ट दिसली पाहिजे. त्याच गोष्टीचे चिंतन केले पाहिजे. आपल्या रंध्रारंध्रात त्याचाच ध्यास असला पाहिजे. आणि असे झाले तरच ती गोष्ट निश्चितच आपल्याला प्राप्त होते. अर्थात आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करण्याचा हा एक मार्ग सर्वांना ज्ञात आहेच.
आणि ही काही खूप आदर्श कल्पना आहे, असे मुळीच नाही. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये व्यवसाय करणारे कितीतरी व्यापारी हे प्रगत आहेत. वर्षानुवर्षाच्या अथक प्रयत्नातून त्यांनी त्यात जम बसवलेला असतो. आणि तोच व्यवसाय आहे ते सातत्याने करताना आढळतात. दुसरा व्यवसाय करत नाही. अलीकडच्या काळात फार फार तर असे पाहायला मिळते की, त्यांनी त्यांची 'दुसरी शाखा' इतरत्र सुरू केलेली आहे. अर्थात ते व्यवसायाचे 'एक्सपान्शन' असते.
शिवाय दुसरी नोकरी असा विचार करायचा या ऐवजी, पहिलीच नोकरी पण दुसऱ्या संस्थेत, दुसर्या कंपनीत वा दुसऱ्या शहरात असा विचार होत नाही. आणि झालाच तर चाकोरीच्या बाहेर पडण्याचे धाडसही केले जात नाही. आणि जे असे धाडस करतात ते अर्थातच यशस्वी होतात. वा त्यांना अपेक्षित ते मिळते. स्वप्न पूर्ण होते. कारण आताचा काळ पूर्वीप्रमाणे 'आजीवन सभासद' याप्रमाणे एकाच संस्थेची चाकरी करण्याचा निश्चितच नाही.
आणि वर्तमान काळात अजूनन एका मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. आणि ते म्हणजे एखादी नोकरी वा व्यवसायात 'स्कोप' असणे. खरेतर स्कोप पाहून दुसरी नोकरी, दुसरा व्यवसाय करणाऱ्यांना तसे उमगलेच तर पहिली नोकरी/व्यवसाय सोडण्याचे धाडस होत नाही. परंतु सत्य तर हे आहे की, 'स्कोप' वगैरे असे शब्द आजच्या काळात कालबाह्य झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे 'स्काय इज द लिमिट' ही नवीन संज्ञा रूढ झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात करू तेवढी संधी प्राप्त होणारे दिवस आहेत. म्हणूनच स्वप्नांचा पाठलाग 'हाफ हार्टेडली' होत नसतो.
फार फार तर या तेवढीच गोष्ट असू शकते की, आपण आपला एखादा छंद हा दुसरी नोकरी व व्यवसाय प्रमाणे जगू शकतो. अर्थात तो आपल्या आनंदाचा भाग आहे म्हणून. कारण त्याकडे आपण उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता निर्भेळ आनंद म्हणून पाहत असतो.
एका प्रकट मुलाखती मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्री अशोक सराफ यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, 'तुम्ही अभिनेता नसते तर काय झाले असते?'
त्यावर त्यांचं स्पष्ट उत्तर होतं की, 'काहीच झालो नसतो. मला अभिनेता व्हायचं होतं. आणि मी अभिनेताच झालो.'
अर्थात खुणावणारी 'क्षितीजं' ही अनेक असू शकतात. पण ज्याचा सातत्याने एक व्यक्ती म्हणून आपण पाठलाग करून प्राप्त करू, समाधानाने जगू असे कोणतेही एकच असू शकते. दुसरे नाही...
म्हणूनच दुसरी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय याचा गांभीर्याने विचार व्हावा...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
श्री नरहर कुरुंदकर यांचे एक प्रसिद्ध विधान आहे, 'एखाद्या व्यक्ती विषयी मनात आदर असणे आणि त्या व्यक्तींची मते निदान प्रमुख मते अजिबात मान्य नसणे, या दोन गोष्टी एकत्र संभवतात. हेच आपण विसरून गेलो आहोत.'
या विधानाचा दाखला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देण्याचे कारण असे की, एवढा मोठा समारंभ होणार आहे, असे म्हटल्यानंतर साहित्य संमेलनामध्ये काही न पटणार्या गोष्टीची घडणारच. आणि त्या आपण मोठ्या मनाने स्वीकारल्या पाहिजे. परंतु सोबतच ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत त्या दाखवून देणे ही देखील प्रत्येक साहित्यिकाची वाचकाची प्रमुख जबाबदारी असते.
मुळात नाशिक येथील साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले ते प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना डावल्याने. एकीकडे कुसुमाग्रज यांची जन्मभूमी म्हणून प्रत्यक्ष साहित्य संमेलननगरीला 'कुसुमाग्रज नगरी' असे नाव दिले जाते. तर दुसरीकडे प्रत्यक्ष साहित्यसंमेलनाच्या गीतांमध्ये सावरकरांचा उल्लेख देखील नसतो. आणि 'स्वातंत्र्य सूर्य' याचा अर्थ तुम्ही सर्वजण समजून घ्या, अशा पद्धतीने तो विषय मांडला जातो. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष सर्व वाचक वर्ग, नागरीक या विरुद्ध बंड करुन उठला त्या वेळेला मात्र नाईलाजास्तव कुठेतरी सावरकरांचं नाव परत या संमेलनाच्या गीतांमध्ये घेतले. ही खरंच खूप साहित्याच्या दृष्टिकोनातून वाईट अशी बाब आहे. सावरकरांचे हिंदुत्व न आवडणं, न झेपणं, न स्वीकारणं हा भाग एकीकडे ठेवून एक साहित्यिक म्हणून सावरकरांना स्वीकारणं हे खरंतर नाशिककरांच्या आणि तथाकथित राजकारण्यांनी ज्यांनी संमेलनामध्ये अधिक सहभाग घेतला त्यांना स्वतःच्या मनाचा उदारपणा दाखवण्याची ही खरं तर फार मोठी संधी होती. परंतु मुख्य प्रवेशद्वाराला आणि गीतांमध्ये त्यांचं नाव न घेता तो स्वतःचा रेटा पुढे ढकलणे यातच त्यांना धन्यता वाटली.
पण नाईलाजास्तव की काय म्हणून कवी कट्ट्याला स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांचे नाव दिलं. आणि त्यांनी शेवटी एका पद्धतीने सावरकर प्रेमींची बोळवण केली. खरे तर शिकागोची धर्म परिषदेमध्ये स्वतःचे भाषण मांडण्यासाठी विवेकानंदांना जेव्हा पत्राची गरज होती, त्यावेळेस प्राध्यापक राईट यांनी विवेकानंदांना उद्देशून म्हणाले होते की, 'तुम्हाला संमेलनात भाषण करण्यासाठी पत्र देणे म्हणजे प्रत्यक्ष सूर्याला प्रकाशन्यासाठी परवानगी देण्यासारखे आहे.' तसेच सावरकरांचे देखील आहे.
सावरकरां चे नाव प्रवेशद्वाराला असो किंवा त्यांच्या संमेलनाच्या गीतातील त्यांचा उल्लेख असो अथवा नसो यामुळे सावरकरांच्या एकंदरीतच प्रतिमेला, त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला कुठेही तडा बसत नाही. उलट बहुदा मराठी साहित्यामध्ये सावरकर हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांच्या स्वतःच्या नावाने साहित्य संमेलन होतात. त्यामुळे अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाला डावलणे म्हणजे खरं तर स्वतःच्या बौद्धिक पातळी चा देखावा मांडण्यासारखे आहे.
तसे पाहता भुजबळांनी आणि पवार साहेबांनी सावरकर यांचा उल्लेख स्वतःच्या भाषणामध्ये केला, ही देखील उल्लेखनीय बाब आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवादच.
दुसरा मुद्दा म्हणजे संमेलनामध्ये अनेक साहित्यिक स्वतःला 'सारस्वत' म्हणून मोठ्या आनंदाने संबोधून घेत होते, एकमेकाला संबोधत होते. परंतु 'वदतो व्याघ्यात' या उक्तीप्रमाणे अगदी संमेलनाच्या सुरुवातीलाच सरस्वतीपूजन नाकारून त्यांनी परत एकदा स्वतःची बौद्धिक पातळी दाखवलेली आहे.
मराठी साहित्य संमेलनामध्ये जावेद अख्तर यांच्या सारख्या थोर गीतकाराला बोलावणे यामध्ये आक्षेपार्ह गोष्ट अशी मला तरी कोणतीही जाणवलेली नाही. त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे, या त्यांच्या विधानाला पुरताच जर विचार केला तर निश्चितच तो राष्ट्रद्रोह आहे. याबद्दल शंका नाही. त्याकरता त्यांनी पाकिस्तान सारख्या देशांमध्ये निश्चितच जाऊन राहू वास्तव्य करायला हवं.
परंतु एक साहित्यिक म्हणून, गीतकार म्हणून त्यांची उंची आणि त्यांचे कौतुकच आहे. त्यांनी संमेलनामध्ये एक अत्यंत सुंदर असा मुद्दा मांडला. आणि तो मुद्दा म्हणजे 'मराठी ही जगातील एकमेव अशी भाषा आहे की, ज्या भाषेमध्ये आठशे वर्षांपूर्वी एक कवयित्री होऊन गेली. आणि तिचे नाव मुक्ताबाई'. पुढे त्यांनी उल्लेख केला की, 'याच कालावधीमध्ये जगभरात साहित्य लिहिल्या जात होते आणि खूप मोठी वैचारिक आणि वैज्ञानिक अशी प्रगती होत होती, त्या वेळेला जगातील महिलांना स्वतःचे साहित्य प्रकाशित करायचे असेल तर ते पुरुषांच्या नावाने करावे लागायचे. अर्थात मराठी भाषा ही किती समृद्ध होती आणि मराठी समाज हा स्त्री-पुरुष या दोघांनाही समान लेखणारा असा होता' असा मराठीचा गौरव जावेद अख्तर यांनी केला, जो कौतुकास्पद आहे.
संमेलनाध्यक्ष नारळीकरांनी मराठी साहित्यामध्ये वैज्ञानिक साहित्य हे तुलनेने अत्यल्प आहे आणि ती मराठी भाषेची कमतरता, उणीव आहे, असं त्यांनी नमूद केलं. वास्तवाला नाकारता तर निश्चित येणार नाही. पण असं साहित्य का नाही, याचं कारण मात्र त्यांनी सांगितले नाही. किंवा त्यांनी त्या कारणाचा विचारही केला नाही.
सुमारे आठशे-नऊशे वर्ष सातत्याने होणाऱ्या आक्रमणामध्ये भारतीय समाज पूर्णपणे अडकलेला होता. स्वतःचं अस्तित्व टिकवणे हा प्रत्येकाचा एकमेव उद्योग होता. मग या सगळ्या कालावधीमध्ये विज्ञानाची प्रगती कशी होणार? जिथे तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकणार का नाही हे माहीत नाही, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या विज्ञानाचं प्रदर्शन कसं करणार? आणि जिथे प्रदर्शनच होणार नाही तिथे त्याची प्रात्यक्षिक कसे होणार आणि मग तिथे विज्ञान साहित्याच्या माध्यमातून येणार तरी कसं? नारळीकरांची विद्वत्ता प्रचंड आहे. परंतु साहित्यिक म्हणून वैज्ञानिक म्हणून काही गोष्टी लोकांच्या समोर मांडत असताना त्या का नाही झाल्या हे देखील मांडणे ही त्यांची जबाबदारी होती, असे मी अत्यंत आदराने आणि नम्रपणे सांगू इच्छितो.
उर्वरित संमेलनातील सर्वच कवी कट्टा, गझल कट्टा, सर्व संवाद, परिसंवाद देखील चांगल्या पद्धतीने झाले. श्री गिरीश कुबेर यांच्या तोंडावर शाई फेकून त्यांना विरोध करणे ही मात्र खरंच वाईट अशी घटना साहित्य संमेलनात घडली. विरोध साहित्यिक मार्गाने व्हायला हवा होता. असो.
संमेलनामध्ये एक अत्यंत सुंदर असे दालन होते. प्रामुख्याने मराठी भाषेची एक खूप छान प्रकाप्रकारे मांडणी केली गेलेली होती. ज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी बहुदा आयोजकांनी, महाराष्ट्र सरकारने कोणी ते नेमकं ठाऊक नाही परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता हा उपक्रम केला होता.
२००४ पासून चे भारत सरकारने प्रत्येक भाषेला अभिजात दर्जा देऊ केलेला आहे. त्यासाठी मराठी भाषेविषयीची सर्व प्रकारची मांडणी एका पंधरा ते वीस मिनिटांच्या व्हिडीओ क्लिप मध्ये सादर केली होती. ज्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामधील मुद्देसूद मांडणी ही सर्व रसिक, प्रेक्षक, वाचक आणि साहित्यिकां समोर करण्यात आली होती. मराठी भाषेला दोन हजार दोनशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे, आणि त्यामधील साहित्यिकांचा उल्लेख आहे, ही मांडणी पाहून खूप अभिमान वाटला. आणि अशा प्रकारची मांडणी 'शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे...' या छोट्याशा पंधरा पंधरा वीस मिनिटांच्या नाटकाच्या माध्यमातून आयोजकांनी केली होती. ही खरंच खूप कौतुकास्पद, आनंदाची आणि अभिमानाची अशी बाब आहे.
एकंदरीतच एक लेखक या नात्याने मराठी साहित्य संमेलनामध्ये काय अनुभवलं ते नि:पक्षपातीपणे मांडावं याच उद्देशाने हा लेख प्रपंच.
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
हे शीर्षक मिनाज लाटकर यांनी लिहिलेल्या 'नफरत जीत गई कलाकार हार गया' या दै.मराठीच्या रसिक पुरवणीत प्रकाशित झालेल्या लेखाच्या प्रतिक्रियाकरिता दिले आहे.
थेट नेमकेपणाने विषय मांडतो. मुळात हिंदु धर्मावर पाहिजे तेवढे विडंबन करणारे हिंदूच आहेत. हिंदू धर्मात चुकीच्या चालीरीती-परंपरा असतील. त्या नाकारता येणारच नाही. त्याच्यावर भाष्य केलेच पाहिजे. नव्हे ती साहित्यिकांची जबाबदारी आहे.
पण काय मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात अशा वाईट चालीरिती नसतील!
मुनव्वर फारुकी मुस्लिम धर्मातील संत आणि देवतेवर विडंबन करू शकेल का? चित्रकार हुसेन यांनी हिंदू देवतांची नग्न चित्र काढण्याचा भीमपराक्रम केला. काय मुस्लिम देवतेचे नग्न चित्र ते काढू शकेतील का?
मुळात तुमची उदारता एकांगी आहे. जेव्हा जेव्हा हिंदूधर्मातील गोष्टींवर तुम्ही भाष्य कराल तेव्हा तेव्हा इतर धर्मावर ही करत जा.
जावेद अख्तर, आमिर खान, शाहरुख खान, नसरुद्दीन शहा यांना भारतात असुरक्षित वाटत होतं. मग ते सुरक्षित मुस्लीम देशांमध्ये का गेले नाहीत?
म्हणून जावेद अख्तर यांना विरोध हा त्यांच्या संकुचित मानसिकते साठी केलेला आहे.
हिंदू धर्मावर भाष्य करा. पण तुमची अभिव्यक्ती इतर धर्मावर भाष्य करून जिवंत राहते का, ते तरी पाहू या एकदा.
तुम्ही मुस्लिम विक्रेत्यांच्या उल्लेख केला. नुकतेच सोशल मीडियावर अन्नात थुकून ते ग्राहकांना खाऊ घालण्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. त्यावर आपली प्रतिक्रिया मात्र अजून आलेली नाही!
मुस्लिमांचे कलेतील योगदान कोणीही नाकारू शकत नाही. भारताच्या सांस्कृतिक वाटचालीतील त्यांचे योगदान प्रचंड मोठे आहे. म्हणूनच आजवर केवळ मुस्लिमच नाही तर जगातील प्रत्येक धर्मातील नागरिकांना भारतात अनादी कालापासून आनंदाने नांदवण्यात आलेले आहे. यहुदी, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान हे आता भारताचा अविभाज्य भाग झाले आहेत.
पण म्हणून जहांगीर, अकबर तैमुर, औरंगजेब अशी कलाकारांनी आपल्या मुलांची नाव ठेवणे म्हणजे आक्रमकांचे उदात्तीकरण केल्यासारखं तुम्हाला नाही वाटत का?
गणेश चतुर्थीला उर्दूतील शुभेच्छा मान्य करूया. पण काय तुमच्या मनात कधीतरी ईद मुबारक या ऐवजी ईदच्या हार्दिक शुभेच्छा किंवा शुभ ईद अशा शब्दांचा विचार आला होता का?
तात्पर्य तुमचे विचार केवळ एकांगी आहेत. ज्यांचा तुम्हाला विजय हवा आहे. परंतु त्याने साहित्यिक हरणार आहे, हे निश्चित.
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
समोरील व्यक्तीपर्यंत तो विषय थेट पोहोचतो. पण ही केवळ शब्दांचीच किमया नाही. कारण अनेक वाक्प्रचार हे त्या त्या स्थानिक जीवनमानामुळे देखील तयार होत असतात. एक प्रकारे तत्कालीन जनजीवन, परंपरा, पद्धती यांचा देखील या सर्वातून परिचय होत असतो.
शिवाय अशा जर काही वाक्प्रचारांतून स्थानिक समृद्धी प्रकट होत असेल तर ती गोष्ट सदैव अभिमानाची असते.
तीच गोष्ट 'लाशीन मठातील खीर' या वाक्प्रचारा संबंधीची आहे.
आज नेमकेपणाने सांगता येत नाही की नेमक्या किती वर्षांपूर्वी 'लाशीन मठातील खीर' हा वाक्प्रचार जनमाणसांत आला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील एका प्राचीन मठाशी संबंधित हा वाक्प्रचार आहे. तो मठ म्हणजे सिद्धेश्वर मठ किंवा त्याला लाशीन मठ असेही संबोधतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मंदिरांमध्ये अन्नछत्रालय चालायचे. त्याच धर्तीवर लाशीन मठात देखील सण-समारंभाच्या दिवशी, सर्व उत्सवांना तसेच दैनिक तत्वावर मठातील देवतेला महादेव 'सिद्धेश्वराला' खिरीचा नैवेद्य असायचा. आणि मग स्वाभाविकच मठात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला किंवा या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला ही प्रसादाची खीर अर्थातच विनामूल्य आणि पोटभर असायची.
स्वाभाविकच प्रत्येक जण तृप्त होऊन जात असणार. संपूर्ण जेवण जेवल्यानंतर तृप्तीचा ढेकर येत असतोच. पण दुधाच्या खीरी मुळे पूर्णान्न मिळाल्याचे समाधान असते. हा अनुभव अज्ञात काळापासून अनेकांनी घेतलेला आहे.
पण काळाच्या ओघात जनमाणसांत मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या लाशीन मठातील खीरीचा दाखला वाक्प्रचारांतून दिला जाऊ लागला.
लाशीन मठातील प्रत्येक भक्ताला, वाटसरूला खीर मोफत होती. म्हणून कोणी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही गोष्ट विनासायास स्वतःच्या उपयोगाकरिता अगदी मोफत मागत असेल अर्थात ती व्यक्ती कुठलेही कष्ट न घेता केवळ मागणी करत असेल तर त्या व्यक्तीला 'ती गोष्ट म्हणजे काय लाशीन मठातील खीर आहे का?' असे उपहासाने विचारले जायचे.
वसमत तालुक्यात हा वाक्प्रचार आजही रूढ आहे. एका बाजूने मागणाऱ्या व्यक्तीला नकळतपणे त्याची कष्ट न करण्याच्या स्वभावाची जाणीव करून देणारा 'लाशीन मठातील खीर' हा वाक्प्रचार अगदी चपखलपणे बसतो. तर सोबतच लाशीन मठाची दानत किती समृद्ध होती याचे देखील दर्शन घडते.
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...