मी काय वेगळे म्हणालो...
कृपाळू सावळ्या मजवर भाळू नको रे
ओंजळभर सुखासाठी, का कळवळून म्हणालो .१.
निराळ्या कळा ह्या सोसताना
आभाळाला कोसळरे म्हणालो .२.
हा पावसाळाही आला नि गेला
मृगजळा तू ही हसरे म्हणालो .३.
पळून थकलो आता मनारे
होरपळून जाळ मज वणव्यास म्हणालो .४.
पळभर ही नको ती सळसळ पळसाची
तळमळही संपव काळ पुरूषा म्हणालो .५.
( प्रस्तुत गझलमधे 'ळ' हे अक्षर २३ वेळेस आहे )
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
No comments:
Post a Comment