Sunday, 10 January 2021

राम




..

एका तथाकथित पुरोगामी मित्राने प्रश्न केला, "राम मंदिर बांधून काय साध्य होणार?"

मी म्हणालो, "राष्ट्र मंदिराचे निर्माण होणार."

प्रश्नार्थक नजरेने तो माझ्याकडे पाहत होता. त्यावर मी म्हणालो "जास्त विचार करू नकोस. केवळ

रामाचे अस्तित्व मान्य करायला लाग."

 

..

एका नवविवाहित युवकाने 'रामसेतू प्रेमाचे सर्वात मोठे स्मारक', असे आपल्या स्टेटसला ठेवले.

त्यावर "याचा अर्थ काय?", असे त्याला त्याच्या पत्नीने विचारले.

उत्तरादाखल तो म्हणाला,

"मला 'एक पत्नी' रहाण्याचा यापेक्षा चांगला दृष्टिकोन अन्य कोणतेही प्रेमाचे स्मारक देऊ शकत नाही."

 

..

" 'राक्षस रावण' असे पाहण्या सोबत 'दशग्रंथी रावण' असा देखील विचार झाला पाहिजे", असे एक मित्र मला म्हणाला.

त्याच्याशी सहमत होऊन मी त्याला म्हणालो,

" मग आपण आतंकवाद्यातील उच्चशिक्षितपणाचे देखील गुणगान केले पाहिजे."

 

..

एक कथाकरांनी 'रामकथे'चा समारोप करताना म्हंटले - 

वाल्मिकीचा प्रवास 'मरा' पासून 'राम' पर्यंत झाला.

पण एवढा कठीण प्रसंग येई पर्यंत आपल्याला थांबता येणार नाही.

कारण आता आपल्यालाच 'नारद' होऊन आपल्यातील 'रामा'पर्यंत पोहोचवायचे आहे...

 

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...