Sunday, 30 April 2023

अलक


 भारतीय विवाह पद्धतीवर विश्वास नसलेल्या दांपत्याला सप्तपदी झाल्यावर गुरुजी म्हणाले,

 “एक पृथ्वी, सात खंड, सात समुद्र, सातशे कोटी लोक अशा या महाकाय जगात एका जोडीदारासोबत सप्तपदी करुन आपण संसार करतो, खरेतर यातच आपल्या संस्कृतीची महानाता समजते…”

Sunday, 23 April 2023

अलक


त्याला बस स्टॉप वरून घेण्यास तिला अर्ध्यातासापेक्षा अधिक उशीर झाला.

एव्हाना त्यांच्या प्रेमविवाहाला एक वर्ष झाले होते.

थोड्यावेळाने ती आली.

आणि ती दोघे घरी निघाली.

त्याने कुठलीही न केलेली चिडचिड पाहून ती त्याला म्हणाली,

"तू असाच आजन्म प्रियकर रहा. नवरा कधीच होऊ नकोस."

अलक


"चमत्कार घडत असतात. देव, दैव आणि देण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. एव्हढेच.."

तो लिहीत असलेल्याला नाटकातील संवादजवळ येऊन थांबला.

क्षणभर सुखावला. नि पुन्हा लिहायला लागला.

तोच फोन वाजला.

पलीकडून कुणीतरी त्याला निरोप देत होते, 

'साहित्य परिषदेवर बिनविरोध निवड होण्यासाठी केवळ आपल्याच नावाचा विचार झाला आहे," म्हणून.

अलक


त्याला दुकानदाराने फसवले आहे, हे त्याच्या लक्षात आले तोपर्यंत त्याने घेतलेल्या वस्तूबद्दल पैसे दिले होते. 

त्याला अधिकचे पैसे गेल्याचे दुःख होत नव्हते तर फसवले गेल्याचे वाईट वाटत होते. 

तो स्वतःला सावरत परत दुकानात गेला.

दुकानदाराला वाटले, 'आता हा भांडण करेल'.

उलट तो दुकानदाराला स्वतःचे व्हिसीटींग कार्ड देत म्हणाला, "कधी काही गोष्टींची मदत लागली तर निःसंकोचपणे माझ्याकडे ये ."

आणि मनातल्या मनात म्हणाला, "मी याला माफ केले नसते तर याने माझ्या मनात घर केले असते."

Sunday, 9 April 2023

अलक

 

तो ‘दिवास्वप्न’ या शब्दाचे वर्णन वर्गात करत होता.

काही वेळाने त्याचे लक्ष एक फाटके दप्तर असलेल्या विद्यार्थ्याकडे गेले, त्याच्या डोळ्यातील विलक्षण चमक पाहून त्याने विषय बदलला.

आता तो ‘दिव्यस्वप्न’ या शब्दाचे वर्णन करू लागला.

अलक


त्याला बस स्टॉप वरून पिक-अप करायला तिला अर्ध्यातासापेक्षा अधिक उशीर झाला. 

एव्हाना त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले होते.

थोड्यावेळाने ती आली आणि ती दोघे घरी निघाली.

त्याने कुठलीही चिडचिड केली नाही. 

हे जाणवून ती म्हणाली,

"तू नवरा मुळीच होऊ नकोस. असाच जन्मभर प्रियकर रहा."

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...