त्याला कोणताही उमेदवार सक्षम वाटत नव्हता. तो NOTA पर्याय निवडून मतदान करणार होता.
एकदा त्याच्या वाचनात आले, ‘NOTA चा लाभ अयोग्य उमेदवारालाच अधिक होतो.
मग त्याने ‘एव्हेलेबल बेस्ट’ हे सुत्र वापरुन मतदान केले.
त्याला कोणताही उमेदवार सक्षम वाटत नव्हता. तो NOTA पर्याय निवडून मतदान करणार होता.
एकदा त्याच्या वाचनात आले, ‘NOTA चा लाभ अयोग्य उमेदवारालाच अधिक होतो.
मग त्याने ‘एव्हेलेबल बेस्ट’ हे सुत्र वापरुन मतदान केले.
एका ज्येष्ठ राजकीय विचारवंतांनी भारतीय लोकशाहीचे वर्णन करणारे ‘पक्षीय राजकारण’ असे आपले पुस्तक प्रकाशीत केले.
त्यातील ‘चिंताजनक’ या सदरात ते लिहितात, ‘ पूर्वीच्याकाळी मित्रपक्ष आणि विरुद्धपक्ष, असे दोन पक्ष असायचे. आता मात्र सत्तारूढपक्ष आणि शत्रूपक्ष, असे दोन पक्ष असतात’.
“ ‘सत्तेसाठी अभद्र युती’केल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकशाही कमकुवत करत आहेत”, एक राजकीय विश्लेषक एका मुलाखतीमध्ये आपले मत व्यक्त करत होते.
“मग लोकशाही सक्षम होण्यासाठी काय उपाय?”, मुलखतकाराने त्यांना प्रश्न विचारला.
ते उत्तरादाखल म्हणाले,
“नागरीकर्तव्यांची जाणीव करून देत निद्रिस्त मतदारराजाला जागे करणे”.
एका पक्षाने आपल्या कार्यकाळात जनतेला अनेक मोफत गोष्टी देऊ केल्या.
परंतू जनतेने पुढील निवडणुकीत त्यांना नाकारले.
एका तज्ञ व्यक्तीने या निकालाचे परीक्षण करत विधान केले,
“लोकशाही आता रुजू लागली आहे.”
‘अपेक्षीत उमेदवार निवडून न आल्यामुळे, आपले मत वाया गेले’, असे एका तरुणाला वाटत होते.
‘अज्ञानातून आलेले विचार’, असे म्हणत लोकशाही हे सगळं पाहत होती.
एका राजकीय पक्षाने सत्तेच्या लोभापोटी आपली विचारसरणी बदलली.
आता निष्ठवान मतदाते निष्पक्ष झाले आहेत.
एव्हाना दोघांनाही कळत नाहीये, नुकसान देशाचे होते आहे.
‘मतदान करतांना NOTA चा पर्याय निवडला तर त्याचा फायदा अयोग्य व्यक्तीला होतो’,
एक ज्येष्ठ विचारवंत या आशयाची मांडणी करत होते.
तरीही लोकांना हा विषय पटत नाही, असे त्यांना जाणवले.
मग त्यांनी ‘महाराज धृतराष्ट्र’ यांचे चरित्र कथन केले.
“या देशांत प्रत्येक नेता आपण निवडून यावे म्हणून जोमाने प्रचार करत असतो”,
एक राजकीय विश्लेषक भारतीय लोकशाहीचे चित्रण मांडत होते.
ते पूढे म्हणाले, “मतदार राजाला मात्र त्याच्या एका मताची अजून किंमत ओळखता आलेली नाहीये”.
‘‘राष्ट्र प्रथम’ म्हणणाऱ्या पक्षांनाच मतदान करा’., एका ज्येष्ठ विचारवंताचा या आशयाचा लेख प्रकाशित झाला.
त्यावर ‘वाचकांच्या प्रतिसाद’ या सदरात एका नागरिकाची प्रतिक्रिया प्रकाशित झाली,
‘राष्ट्र प्रथम या संकल्पनेपूर्वी आपण जगातील प्रथम राष्ट्र आहोत,
ही भावना जागृत झाली पाहिजे’.
मास्यांना फिशटँकमध्ये आणून सोडल्यानंतर सुरक्षित वाटायला लागले.
काही वेळानंतर मात्र त्यांना लक्षात आले,
आपण ‘सुरक्षित’तेसाठी ‘स्वातंत्र्याची’ किंमत मोजली होती.
‘बदमाशांचे सर्वात पहिले आश्रयस्थान म्हणजे राजकारण….’,
तो एका ज्येष्ठ विचारवंताचे पुस्तक वाचत होता.
तो क्षणभरासाठी विचलित झाला.
त्याला कळत नव्हते,
‘संविधान वाचवा’ असे कोण म्हणत आहेत?’
“उन्हाळा, हिवाळा, पावसाळा”,
त्याच्या मुलाला ऋतू क्रमाने न सांगता आल्यामुळे तो काळजीत पडला.
मग त्याने स्वतःच्या दिनक्रमात ‘पर्यावरणा’साठी स्थान ठेवले.
तिची किशोरवयीन मुलगी आनंदनगरीतील उंच आकाशपाळण्यात देखील बिनधास्तपणे बसली.
ती मुलीचे ‘धाडस’ अनुभवत होती.
ती घरी आल्यावर त्याला म्हणाली,
“मी उगाच आपल्याला एक मुलगा असावा, अशी अपेक्षा ठेवून होते”.
“आई, तू रोजच नवरात्रीच्या रंगांच्या साड्या घालतेस. मलाही आजच्या निळ्या रंगाचा ड्रेस पाहिजे”, असे म्हणत तिची इटुकली लाडो रुसून बसली.
तिने या क्षणी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला नाही.
उलट तिला आयुष्यातील एक-एक रंगाचा परिचय करून देण्यास सुरुवात केली.
‘ज्या व्यक्तीच्या माघारी तिच्या विषयी चांगलं बोललं जातं, ती उत्तम व्यक्ती’,
सद् गुरु विषय मांडत होते.
त्यांना भक्तांच्या चेहऱ्यांवर अस्वस्थता जाणवली.
मग त्यांनी लगेचच सोपा मार्ग दाखवला,
‘चांगलं दिसण्यांसाठी मनुष्य जसा प्रयत्न करतो तसां चांगलं असण्यासाठी प्रयत्न करायचा’.
तिने नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवासाचेही पदार्थ खाल्ले नाही. असे कठोर व्रत केले.
तिला दशमीला उपवास सोडतांना लक्षात आले होते,
‘आता इथून पुढे ‘जीवनावश्यक गोष्टी’ कशाकशाला म्हणायचे’.
‘पहिली मुलगी होऊ दे’,
तिने देवीला नवस केला.
नि विशेष म्हणजे तिला घरांतील कुणीही विरोध केला नाही.
नंतर तिने मुलगी झाल्यावर तिला पहिले काही शिकवले असेल तर, ते म्हणजे ‘जग कसे ही असो आपण स्वतःहून निर्णय घेणे’.
तिने नवरात्रीच्या दिवसांत शुद्ध तुपाचा अखंड दिवा लावला.
तिच्या किशोरवयीन मुलाच्या लक्षात येत होते,
‘सर्वोच्च गोष्ट प्राप्ती सर्वोत्तम गोष्ट दिल्या शिवाय होत नाही’.
तिने नवरात्रीचे नवरंग म्हणून कपाटातून नऊ साड्या काढून ठेवल्या.
परंतू का कुणास ठाऊक तिला जाणवत होते, देवीच्या पूजेत एव्हढेच पुरेसे आहे, असे नाही.
नि मग तिने देवीच्या पूजेत ‘आत्मरंग’ मिसळला.
तिने देवीच्या नऊ दिवसांच्या नऊ रुपांचे ध्यान केले. तिला अत्यंत शांतता लाभत होती.
तिला दहाव्या दिवसाचे ध्यान करतांना मात्र जाणीव झाली,
आता आपल्याला या रुपात अधिक काळ राहण्याची आवश्यकता आहे.
त्याच्या मित्रांनी वयाचे १८ वर्ष पूर्ण होताहेत म्हणून पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज भरला.
तो थोडा वेडा होता.
त्याने मतदार यादीत नाव नोंदवणवियास प्राधान्य दिले.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...