'सांज खुलणे' हे निसर्गाच्या अनेक लोभस रूपांपैकी एक रूप. आनंद, प्रसन्नता, मंगलमय, शांत आणि तरीही तेजस्वी असे हे रूप मनाला नेहमीच भुरळ घालत आलं आहे.
त्यादिवशीही अशीच सांज खुलली. आणि थेट माणुसकीच्या कोलाहलातून बाहेर पडलो. शांत अशा निर्जन स्थळी जाऊन थांबलो. निसर्गाच्या या रूपाचा आनंद मनमुराद घेण्यासाठी.
काळ आणि वेळेच्या पाशातून मन विचलित होऊन परतताना असंच एक प्रगल्भ, सुंदर आणि मनमोहक स्त्रीरूप दिसलं आणि मन अजूनच उल्हसीत झालं.
लोकलज्जेचं भान न ठेवता थेट मागणी घालावी इतकं प्रेम निर्माण झालं. मंगल्याच्या या मूर्त रुपात आपल्याला न्हाता येईल याचा मनस्वी आनंद झाला.
नि तत्क्षणी सौदामिनी कडाडावी असा साक्षात्कार झाला. बालपणी गायलेल्या सायं प्रार्थनेच्या ओळी आठवल्या, 'ज्या ज्या स्थळीये मन जाय माझे, त्या त्या स्थळीये निजरूप तुझे'.
माझं प्राक्तन तर कधीच भरून गेले आहे, याची जाणीव झाली. अशी प्रेममय रुपं तर मला पदोपदी मिळणार आहेत. मग मी एका रूपात कसा स्वतःला सामावून घेणार?
म्हणून त्या अनंताच्या रुपाचं स्मरण करत, तिन्हीसांजेची कृतज्ञता व्यक्त करून परत निघालो.
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
37 comments:
कृपया नवनवीन लघुकथा, ललितकथा, ललित लेख वाचण्याकरिता माझ्या ब्लॉगला फॉलो करावे.
आपले अभिप्राय मला प्रेरणादायी असतील.
धन्यवाद.
हेमंतजी, छानच. असेच व्यक्त होत रहा व समाजाला आनंद देत रहा. 👍
खुप छान हेमंत जी
व्वा हेमंत जोरदार....शेवट फक्त अनपेक्षीत केला....
Khup chan Hemant Dada
छान मांडणी ! प्रत्येकाला स्वतःचे निजरूप आठवावे अशी
छान लेख आहे सर
वा. लेखक हेमंत चा उदय. तुझ्या या सांज अनुभवातून उद्याचा सूर्य तळपो. अनंत हार्दिक शुभेच्छा.
रूप लोभस, साज लोभस, त्यात दिवसाचा थकवा नाही,
आशेचे असंख्य अंकुर गर्भात घेउनी येते,
त्या 'सांजे' ला उपमा नाही.
समीर
हेमंत सर म्हणजे एक उत्तम शिक्षक, एक कुशल संघटक, एक प्रभावी वक्ता, एक मधुर बासरी वादक, वाचन आफाट असणारा एक सखोल वाचक .....आणि आता एक लेखक.....
Khup ch mast
हेमंत , लिहता झालास हे चांगल झालं. तुझ्यातली श्रजनशिलता व्यवहारी जगात हरवते की काय असं वाटल होतं. तुझ्यातला जीवनप्रवाह अखंड आहे , याची ही साक्षच. तो निरंतर प्रगतील राहावा , हिच सदिच्छा..!
लघुकथेतल निजरूप अप्रतिमच...!!
वा खुप छान लेख आहे
हेमंत जी
बापरे ! माणसे बदलतात पण ऐवढे ?
म्हणजे तस नाही हो, खुपच छान आहे हे#
या मुळे तुमचे एक नविन रूप आम्हाला कळाले.जे कदाचीत आमचे समोर आलेले नव्हते.
नाव पण खरच खुप छान आहे-अभिधा एक शब्दशक्ती.
लघुकथा "निजरुप तुझे" छानच आहे. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत .......
खुप खुप अभिनंदन व आभार या माध्यमातुन आमची झाकुन ठेवलेली वाचन शक्तीस चालना दिले बद्दल.
संतोष इसादकर
हेमंतजी तुमचे नवीन रूप दिसले एवढी अलंकारिक भाषा पहिल्यांदा वाचण्यात आली .
पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप छान......👍
हेमंत जी तुम्ही पण....! व्हा...!
हेमंत जी तुम्ही पण....! व्हा...!
छान मांडणी. लेखन कार्यास शुभेच्छा
हेमंत खुप छान लेखन.
समीरजी मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद.
कृपया अभिप्रायानंतर आपले नाव नमूद करावे unknown असे लिहून येते, म्हणून.
मनःपूर्वक धन्यवाद.
कृपया अभिप्रायानंतर आपले नाव नमूद करावे unknown असे लिहून येते, म्ह
मनपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद.
छंद जोपसतोय एव्हढच.
कृपया अभिप्रायानंतर आपले नाव नमूद करावे unknown असे लिहून येते, म्ह
संतोषजी मनःपूर्वक धन्यवाद
लिखाण फार पूर्वीपासूनच करायचो
आता नव्याने सुरुवात केली आहे
मनःपूर्वक धन्यवाद.
कृपया अभिप्रायानंतर आपले नाव नमूद करावे unknown असे लिहून येते म्हणून
मनःपूर्वक धन्यवाद.
कृपया अभिप्रायानंतर आपले नाव नमूद करावे unknown असे लिहून येते म्हणून
मनःपूर्वक धन्यवाद सर्वांचे
कृपया अभिप्रायानंतर आपले नाव नमूद करावे unknown असे लिहून येते म्हणून
मनःपूर्वक धन्यवाद.
कृपया अभिप्रायानंतर आपले नाव नमूद करावे unknown असे लिहून येते म्हणून
खूप सुंदर हेमंत. तुला खुप खूप शुभेच्छा
खूपच छान,हेमंत! तुझ्या उमलत्या नावनोन्मेषशालिनी प्रतिभेला खूप खूप शुभेच्छा!!!💐💐💐
अभिनंदन,
हेमंतराव खुप छान लेख आहे. दुसर्या लेखाच्या प्रतिक्षेत आहोत.
मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद विनयजी
व्यक्त होणे निसर्ग देणं!आपल्याला ते छान जमते,लिहत रहा,अनेक अनेक शुभेच्छा!
Very nice hemant
Khup chan Dada
Manish Lalpotu
Post a Comment