बाबा. बाबा म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहतं एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व. अगदीच धाक, दरारा हे जरी आमच्या पिढीने अनुभवलेल नसलं. तरी एक आदरयुक्त भीती नेहमीच अनुभवली. आई जवळ सगळा हट्ट चालायचा. पण बाबांना मागायची बिषाद नसायची. पण आईमार्फत तो बाबा पर्यंत पोहोचला की काही क्षणात पूर्ण देखील व्हायचा.
पण आता काळ एवढा वेगाने बदलतो आहे की, हा मधला मार्ग आता राहिला नाही. पूर्वी पिढी विस-पंचेवीस वर्षाला बदलायची. आता तर ती अगदीच पाच-सात वर्षात बदल बदलते आहे.
'प्राप्तेतू षोडशे वर्षे पुत्रं मित्र वदाचरेत', हे विधान एव्हाना पाच सहा वर्ष वयापर्यंत येऊन पोहचल आहे.
म्हणूनच की काय आता 'ओ बाबा' 'ए बाबा' झाला आहे.
मुलांना मारणे तर खूप दूरचा विषय, त्यांना रागवणे देखील कधीतरी होतं.
तसं पाहता हे काही काळाच्या प्रवाहात वाहण्यासारखा नाही. कारण नवी पिढी अधिक प्रगत होत चालली आहे आणि प्रगल्भ देखील.
आमच्या पिढीला बाबासोबत खेळल्याच कधी आठवत नाही. पण आता नवी पिढी बाबा खेळायला नसेल तर रुसून बसते. बाबा कामावरून आला की, काय काय करायचं याचे जणू वेळापत्रकच तयार असतं.
बाबा आता साखरेच पोत होतो. बाबा जेवू घालतो, प्रसंगी न्हाऊ घालतो. अगदी डायपर बदलतो, शी सुद्धा काढतो.
घरात सगळ्यात जास्त धिंगाणा कोण करतं, तर उत्तर येते बाबा.
'बाबा तू कुठे जायचं नाही'. 'बाबा आज सुट्टी घे'. 'बाबा किती काम करतोस'? 'बाबा जरा आराम करत जा'. अशा सूचना आता सर्रास ऐकू येतात.
बाबाला आता सुट्टीच नियोजन कराव लागत नाही. शॉपिंगची काळजी करावी लागत नाही.
'बाबा या रविवारी डोंगरावर जाऊ'. 'बाबा आज रात्री आईस्क्रीम खायला जाऊ'. एवढेच काय कोणत्या हॉटेलमधे जेवण कसं आहे इथपासून ते बाबांना कोणते कपडे घातले तर चांगले दिसतात, हे पण ठरवलं जातं.
'बाबा या रविवारी डोंगरावर जाऊ'. 'बाबा आज रात्री आईस्क्रीम खायला जाऊ'. एवढेच काय कोणत्या हॉटेलमधे जेवण कसं आहे इथपासून ते बाबांना कोणते कपडे घातले तर चांगले दिसतात, हे पण ठरवलं जातं.
थोडक्यात काय तर प्रेम, विश्वास आणि आदर हा पूर्वीच्या बाबांकडून मिळालेल्या वारश्यामध्ये नव्या पिढीचा बाबा मित्रत्वाची भर घालतोय एवढेच.
@हेमंत विनोद पोहनेरकर
41 comments:
कृपया आपल्या अभिप्राया सोबात आपले नाव अवश्य लिहावे. कारण या वेबसाईटवर नाव न लिहिल्यास unknown असे लिहून येते.
खुप छान लेख आहे
दिपक मुळे
सुंदर
छान 👌🏻
- प्रशांत मोराणकर धुळे
सत्य परिस्थिती आहे, छान लेख आहे
अगदी हुबेहूब प्रत्येक घरची कहाणी छोट्याश्या अतिशय समर्पक शब्दात मांडलीस मित्रा. खूप शुभेच्छा
I can't write in Marathi, however what you express is what I am experiencing now! Very apt. Thanks
सुंदर आहे लेखन
हम दो हमारा एक ह्या त्रिकोणी अथवा चौकोनी कुटुंबातील बाबा चा दरारा एकूणच कमी होत आहे
नितीन कुलकर्णी
Very true. Priorities changing as per time .
उत्कृष्ट लिखाण...
आपले लिखाण ओघावते आहे आणि त्यामुळेच ते हृदयाला स्पर्शून जाते. वाचकाला ते स्वतःशी जोडून ठेवते.
सध्या समाजामध्ये जे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत अशा सर्व प्रश्नांमधून काही ठराविक परंतु त्यातील अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर आपल्यासारख्या नव-लेखकांनी लिहिणे निश्चितच आवश्यक आहे नव्हे ती आज काळाची गरज निर्माण झालेली आहे.
आपल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
ॲड. रोहित सर्वज्ञ
सुंदर लेख आहे सरजी!काळाची गरज आहे बाबा मित्रा सारखेच असावेत.
Very nice hemant
सुंदर
अप्रतिम लिखाण आणि खरोखर आत्ताच्या परिस्थितीशी समरुप आहे.. असेच लेखाच्या प्रतिक्षेत, ब्लॉगच्या स्वरुपात...
Masta Hemant ji, Apratim
सुंदर लेख हेमंत आत्ताच्या परिस्थितीशी समरुप आहे.
अभिनंदनीय.....
सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद
खुप सुंदर...
विजय काळे
Nuclear family chi samasya ...aani upay sudhha...aaji aajoba astil sobat tar
Khup sundar lekh aahe aani he sarvatha satya aahe
Kailash ambhore
Khup Sundar lekh aahe.
Vishal Raut
Great dada
Khup Chan
Khup Chan
Nice Hemant...
छान, हेच बाबा आताचे, बाबा मनजे आई .
Bahot badiya Hemant 😍👌
हेमंतजी, लय भारी..
सचिन कोंडेकर
Chan
छान लिहीले प्रकाश कुलकर्णी सातारा परीसर औरंगाबाद
खुपच सुंदर...मलहर,अभिधा चे बाबा..
खुपच सुंदर... ढोमू अभिधा चे बाबा
आशु
खूप छान
खूप छान
खुप छान
प्रविण उखा सोनवणे
CHAN LEKH AAHE HEMANT JI
खूप छान..!
वंदे मातरम्
सुंदर
आपण सर्वांनी दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Purbhaji Kadam...
Superb...It is Very Heart Touching...
Chan
Post a Comment