सोपं आणि अवघड. चांगलं आणि वाईट.
या दोन्ही प्रकारच्या गोष्टींमधे काहीतरी एक निवड करण्याचे
प्रसंग नेहमीच येत असतात.
सोपं आणि अवघड यामधे सोपं निवडतो तर चांगलं आणि वाईट यामधे आपण चांगल्याची निवड करतो. नव्हे तसा सहज मानवी स्वभावही असतो.
परंतू सोपं आणि चांगलं या मधे निवड करायची झाली तर वाईट
वाटतं की, काय हा अवघड प्रसंग ओढवला आहे.
तरीही स्वभावतः सोपंच निवडल्या जातं. चांगलं
प्राधान्यक्रमावर तेंव्हाच येतं जेंव्हा सोपं अवघड वाटायला लागतं.
सोपं सोयीच असतं. परंतू सोपं चांगलं असतंच याची शाश्वती देता
येत नाही. आणि चांगलं सोपं नसतं याची खात्री मात्र नक्की देता येते.
चांगल्याची सांगड अवघाडासोबातच आजवर झालेली आहे. कारण चांगलं
चांगल्या गोष्टींना वाईटापासून सहजपणे दूर
ठेवतं.
खरं तर चांग्ल्याला सोपं करणं ही एक अवघड कला आहे.
अन्यथा अवघड वाईटाच्या संगतीत राहणे हे नेहमीच सोपं वाटत
आले आहे.
तात्पर्य सोपं चांगलं आणि अवघड वाईट वाटण्यापेक्षा चांगलं
सोपं आणि वाईट अवघड वाटले पाहिजे.
असं झालं तर अवघडही सोपं वाटायला लागेल आणि वाईट कधीच
चांगलं वाटणार नाही.
यावरही चांगलं वाईट वाटत असेल तर समजावं की आता सगळं सोपं
अवघड झालं आहे.
आणि अगदी 'चांगलच वाईट वाटलं' असा प्रसंग ओढवला तर नक्की खात्री देता येते की, आता कोणतही अवघड सोपं होऊ शकतं.
©हेमंत विनोद पोहनेरकर
21 comments:
Leka are kay he...
Sopa avghad, avghad sopa, changla vaait ani vaait avghad...
कृपया आपले अभिप्राय अवश्य द्यावे व आपले नाव ही लिहिणे.
धन्यवाद
Best hemant
Wahhh pratek veli Navin kahitari shikayla bhetet Hemantrao ......khupach Chan...
एकदम बरोबर
सगळंच वाईट चांगलं व्हावं म्हणुन समोरचे सगळं अवघड सोपं होण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करता येवू शकतात.
खूप छान..
खूप छान...लिहीत जावे
सुरेख लेखन व आम्हाला ही ब्लाँक तयार करण्याचे शिकवा
Hemant, good things are always easy n bad things always painful
एखादी गोष्ट सोपी वाटत आसली तरी ती अवघड असते
अरे इतकं सोप तात्पर्य पण किती अवघड करून लिहिलेस, वाचतांना इतकं अवघड वाटतय तर पुढची गोष्टच लांब
आपला अनुभव व दृष्टीवर अवलंबून अाहे.
छान विषय आहे .
खुप छान
मस्त
Mast Sir Ji.....
खुपच चान !!!
मन:पूर्वक धन्यवाद
Nice sir👌🏻👌🏻
वा छान वाटले सोपं नक्कीच नाही
सुप्रभातम् 🙏
अगोदर संस्कृत अवघड वाटायच पण ते चांगलच होत
आता ते सोप वाटतय आणि ते आताही चांगलच आहे.
म्हणजे आता अवघड सोप झालय व तेही चांगलच आहे.
तसा आपली अभिधा आगोदर पण सोपी होती आताही सोपी आहे आणि चांगलीतर ती सततच राणार आहे चांगल्या दिवसाच्या व आजच्या चांगल्यात चांगल्या अवडेल्या अवघड सोप करून सांगणारे लघु लेखाचे लेखक व परीवाला खुप खुप शुभेच्छा.
🙏👌😄🌹👌🌹😄
अभिप्राय चांगला वाटला ते सांगावा.
Post a Comment