काय? कशी वाटली सुरुवात? तू तुझ्या पत्राची सुरुवात मला 'सखी' संबोधून केली. मी देखील खूप विचार करत होते तुला काय संबोधावे म्हणून. पण 'नवरोबा' या व्यतिरिक्त योग्य संबोधन मला दुसरे कोणतेही मिळाले नाही.
शिवाय पत्राच्या सुरुवातीलाच मी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. मी तुला 'प्रिय' म्हणाले. 'नवरोबा' म्हणाले. आणि हो, तू जरी मला 'सखी' म्हणून मैत्री जपण्याचा प्रयत्न केला असलास तरी मी तुला नमस्कार करायची विसरले नाही. तुझं स्थान माझ्यासाठी नेहमीच आदराचा आहे, म्हणून.
आणि ओघाने या पत्राच्या उत्तराच्या निमित्ताने अनेक वर्षांच्या संसारात 'अहो' म्हणताना 'अरे' कधी म्हणायला मिळालेच नाही. म्हणून तुझा पत्रात एकेरी उल्लेखही मला खूप आनंद देत आहे. तसे पाहता माझ्या अनेक मैत्रिणी, बहिणी या त्यांच्या नवर्यांना अगदी सासु-सासर्यां समोर एकेरी संबोधतात. पण मला हे असं कधीतरी 'तू' म्हणन अधिक आवडतं.
तुला मला पत्र लिहावसं वाटलं, तू ते लिहिलंस, खरंच मला खूप आनंद झाला. मी अनेक वेळा तुझा पत्र वाचलं. प्रत्येक वेळी तुझं प्रेम नव्याने अनुभवता आलं. असंही प्रेम अनुभवता येतं हा अनुभव तसा नवीन नाही पण हरवलेल्या दिवसानंतर तो परत सापडल्यामुळे विशेष वाटला. आणि त्यातही तुला प्रेमाची जाणीव किंवा नवा दृष्टिकोन आपल्या मुलीमुळे मिळाला हे वाचून अधिक आनंद झाला.
आम्ही मुली असतोचमुळी जीव लावणाऱ्या.
शिवाय आपल्या मुलीमुळे तु खूप हळवा झालास, प्रेमळ झालास, आणि तुला तिच्याकडून शिकायला मिळते आहे, ही गोष्ट कळाली तेव्हा खूप वेगळे वाटले. सुरुवातीला मला याचं खूप नवलही वाटलं. पण मुलाला मात्र तू खूप काही सांगत होता, प्रसंगी शिक्षाही करत होता तेव्हा उलगडत गेलं आणि तुझा अभिमान वाटला.
आम्ही मुली असतोचमुळी जीव लावणाऱ्या.
शिवाय आपल्या मुलीमुळे तु खूप हळवा झालास, प्रेमळ झालास, आणि तुला तिच्याकडून शिकायला मिळते आहे, ही गोष्ट कळाली तेव्हा खूप वेगळे वाटले. सुरुवातीला मला याचं खूप नवलही वाटलं. पण मुलाला मात्र तू खूप काही सांगत होता, प्रसंगी शिक्षाही करत होता तेव्हा उलगडत गेलं आणि तुझा अभिमान वाटला.
तू तुझे प्रेम पत्र म्हणजे 'माफीनामा आहे असं समज' असं म्हणाला. पण प्रेमात कसली आली आहे रे माफी?प्रेमात केवळ जाणीव असते, काळजी असते, प्रियकर किंवा प्रेयसीसाठी सर्वस्व अर्पण करायची तयारी असते. आणि ती वेळोवेळी व्यक्त होत गेली किंवा जाणवत गेली की पुरेसं असतं.
आणि तुझं प्रेम मला सातत्याने जाणवतं. आणि हो, तू माझी काळजी अगदी माझ्या बाबा प्रमाणे घेतो. मी माझ्या बाबांची लाडकी आहे. ते मला परी म्हणायचे. (आता तू अप्सरा म्हणतोस. असो.) पण तुझ्या प्रेमामुळे, माझ्याबद्दलच्या काळजीमुळे तर मी तुझ्या घरात रमले. माझ्या बाबांना विसरायला लावणारा तूच तर आहेस.
पण खरं सांगू, मला थोडी तक्रार पण करायची आहे. अगदी तक्रारनामा वगैरे नाही.
पण तू अजूनही विसरभोळा आहेस. घरातील आणायच्या गोष्टींबद्दल मी बोलत नाहीये. त्या तर तू विसरतोच म्हणा. मला त्यांची मला आठवण करून द्यायची नाही. पण आपल्या दोघांच्या अनेक गोष्टी तू विसरतोस. मी वाट पाहत असते तुला आठवेल आपली पहिली भेट, तू दिलेली पहिली भेटवस्तू. तू लिहिलेले पहिले पत्र. आपण पहिल्यांदा भेटलो ती जागा. अगदी तू लग्नाची तारीख विसरला नाहीस पण वर्ष विसरतोस. आपल्या साखरपुड्याची तारीख विसरतोस. आणि नवीन नवीन लग्न झाल्यावर रोज गजरा आणायचा, ते पण तू विसरलास.
तुला हे मी मुद्दामच सांगते आहे. आम्हा बायकांना मुळी या गोष्टींमधे खूप आनंद मिळतो. एखाद्या सणाला साडी नाही मिळाली तरी चालते. पण या गोष्टी मिळाल्या की खूप हायसं वाटतं. (पाहिजे तर मग साडी मागता येते म्हणा! पण आधी ते आठवलं तर पाहिजे.)
बघ! मी हे सारं पत्र तुला थेट लिहीत आहे. तू म्हणतोस ना, 'तू तुझ्या सारखी असायला पाहिजे'. म्हणून मी माझ्या प्रमाणे लिहिते आहे.पण माझ्या या लिखाणामागे तू आहेस. माझ्या या असण्यामागे तू आहेस. म्हणून माझ्या बाबांच नाव काढून तुझं नाव लावल्यानंतर मला तोच आधार वाटला आणि तिच काळजी वाटली.
खरंच या साऱ्यांच तू मला सौभाग्य दिलेस, मी खरंच भाग्यवान आहे.
असो. आता थांबते.
खरंच या साऱ्यांच तू मला सौभाग्य दिलेस, मी खरंच भाग्यवान आहे.
असो. आता थांबते.
सदैव तुझीच,
सखी
टीप : - तुझी खूप स्तुती केली असली तरी शेफारून जायचे काही कारण नाही. मी तुला काम सांगायला आणि भांडायला कुठेही कमतरता ठेवणार नाही. नव्हे, हा माझा लग्नसिद्ध अधिकार आहे.
©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

3 comments:
फारच अप्रतिम . अगदीच एखाद्या विवाहित स्त्रीच्या अंतरातील भाव आहेत. ऊत्तम
हळव्या मनाचे हळवे बोल
मन:पूर्वक धन्यवाद
Post a Comment