होय! मी तुमच्या बद्दलच बोलतोय
इर्षा, द्वेष, अहंकार, अहंभाव, नावड
अशी कितीतरी गोष्टी सांगता येतील.
छे! छे! उघडपणे मुळीच नाही
आतल्याआत मनाच्या गाभार्यात
प्रसन्नतेच्या जागी, मी प्रसिद्धीला ठेवले आहे
म्हणूनच मला तुम्ही आवडत नाहीत...
तुम्ही माझ्यापेक्षा वरचढ,
तुमची बुद्धी, तुमची प्रगती, तुमची संपन्नता
एकंदरीतच तुमचं कौतुक करणे
मला कधीच जमले नाही.
सांगा ना! खरच एकदा
‘मी’ नेहमीच मोठा असतो ना!
म्हणूनच मला तुम्ही आवडत नाहीत...
तसा मी ही साधारणच आहे.
पण मी कुठेतरी वाचले होते,
‘सामान्य माणसात
काही असामान्य गोष्टी असतात’
त्या दिवशीपासून हे माझे गृहीतक पक्के होते
की, तो असामी ‘मी’च!
म्हणूनच मला तुम्ही आवडत नाहीत...
असो, तरीही मी एकदा
तुमच्याशी संपर्क करेण,
तुम्हाला भेटेण,
बघूया तरी..
तुमची आभा किती मोठी आहे ?
‘मी’ दिपून गेला नाही, तर...?
हरवण्यासाठी ‘मी'ला तुम्ही मदत केली नाही तर...
मग मात्र मला तुम्ही नक्कीच आवडणार नाहीत....
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
2 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे
सहज सुंदर नकारात्मक प्रवृत्तीना सहजपणे नाकारणे.. .छान लिहिलंय
Post a Comment