एकात्मवाद, द्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद हे सारे वाद मनुष्याने मनुष्याकरिताच मांडले.
अर्थात सर्वांच साध्य मनुष्याचा मोक्ष हेच होतं.
अर्थात सर्वांच साध्य मनुष्याचा मोक्ष हेच होतं.
पण एके दिवशी एक नवाच वाद निर्माण झाला.
हा वाद पंचमहाभूतांमधील होता.
पृथ्वी म्हणाली, "स्पर्शाला अर्थ आणि आकार मी प्राप्त करून दिला".
जल म्हणाले, "मी तर जीवन. माझ्या विना जीवनाची कल्पनाच व्यर्थ".
तेज म्हणाले, "चैतन्य तर माझ्यामुळेच निर्माण झाले".
वायु म्हणाला, "मी तर प्राणवायू. माझ्या संचाराविना सारे काही स्तब्ध".
आकाश म्हणाले, "काम, क्रोध, शोक, मोह, भय मी निर्माण केले. कल्पनाविलास ही मीच".
आकाश म्हणाले, "काम, क्रोध, शोक, मोह, भय मी निर्माण केले. कल्पनाविलास ही मीच".
ही सगळी पंचमहाभूते आपआपल्या मतांवर खूपच ठाम होती.
प्रत्येकजन आत्मस्तुतीच रमाला होता.
आणि शेवटी वाद एवढा वाढला की, प्रत्येक महाभूतानी विभक्त व्हायच ठरवलं.
पण काळाचा महिमा इतका अगाध की,
मोक्षाच्या वाटेवरील मनुष्याला मात्र तिळमात्र काळजी नव्हती.
मोक्षाच्या वाटेवरील मनुष्याला मात्र तिळमात्र काळजी नव्हती.
@हेमंत विनोद पोहनेरकर
15 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे.
सुंदर... असाच लिहीत रहा...
हा मोक्ष स्वर्गप्राप्तीचा की नरकयातनांचा ???
हा मोक्ष स्वर्गप्राप्तीचा की नरकयातनांचा ??
माणूस एकाच विचारात गुरफटला कि वादात अडकतो, विवेकी असला कि वादांवर तरंगतो.
लय भारी
Very nice 👌👌👌👌
छान प्रेरणादायी
Wah! Apratim!! Go ahead, !!!
राष्ट्रीय दि.21कार्तिक1940
खुप छान!!
मानवी स्वभाव सूंदर चित्रण
Hunn
Khup chan
अतिशय सुंदर लेख
खुप सुंदर
मस्तच
Post a Comment