'व्यक्ती तितक्या प्रकृती'.
'प्रकृती'मध्ये अर्थात सृष्टीमध्ये जेवढ्या प्रकारच्या व्यक्ती आहेत, तेवढ्याच प्रकारच्या त्यांच्या प्रकृती आहेत, स्वभाव आहेत. कृती नियमीत झाली की, ती पुढे जाते, तिला 'प्र' उपसर्ग लागतो. आणि ती प्रकृती बनते. अर्थात स्वभाव तयार होतो.
'प्रकृती'मध्ये अर्थात सृष्टीमध्ये जेवढ्या प्रकारच्या व्यक्ती आहेत, तेवढ्याच प्रकारच्या त्यांच्या प्रकृती आहेत, स्वभाव आहेत. कृती नियमीत झाली की, ती पुढे जाते, तिला 'प्र' उपसर्ग लागतो. आणि ती प्रकृती बनते. अर्थात स्वभाव तयार होतो.
मग अशा व्यक्तींची किंवा त्यांच्या प्रकृतींची
वर्गवारीही करता येते. नव्हे, तसे काही प्रकार विद्यमान आहेत.
त्यातील एक वर्गवारी ही व्यक्तींना तीन प्रकारात
विभागते.
पहिल्या प्रकारच्या व्यक्ती या अशा असतात ज्या जेव्हा जेव्हा परस्परांना भेटत असतात, तेव्हा तेव्हा त्या तिसर्या व्यक्तीबद्दल बोलत असतात. आणि
स्वाभाविकपणे त्या तिसऱ्या व्यक्तीची उणीदुणी काढत असतात. माघारी केली जाणारी 'परनिंदा' हा त्यांचा सहज
विषय असतो, अंगभूत सवय असते. प्रत्यक्ष समोर गोड गोड असंच वातावरण असतं.
दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींचा स्तर थोडासा वरचा
असतो. या व्यक्ती जेव्हा जेव्हा एकमेकांना भेटत असतात, तेव्हा तेव्हा त्या कल्पनांचा विस्तार करत असतात. 'काही उत्तुंग कल्पना राबवू' अशा आशयाच्या गप्पा मारत असतात. बौद्धिक रंजकतेत त्या रममाण
होत असतात. त्यातच त्यांना आनंद मिळत असतो. परंतु त्यांचा कधीही प्रयत्नांशी संबंध
असत नाही.
पण ते एक स्तर वर असतात. कारण किमान त्यांनी परनिंदा
टाळलेली असते.
आणि सर्वोच्च स्तर असतो, तो तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तींचा.
या व्यक्ती परस्परांना भेटत असतात, ती प्रत्यक्ष कृती करून.
आणि केलेल्या कृतीची, कर्तव्याची वाच्यता करणे देखील त्या सदैव टाळत असतात.
'आधी केले मग सांगितले', हा देखील प्रकार त्यांच्या जवळ नसतो.
परनिंदा नसते, कल्पनाविलासही नसतो.
असतो तो केवळ कर्मयोग आणि कर्तव्ययोग.
आपण नेहमीच अशा तीनही प्रकारच्या व्यक्तींच्या
सहवासात येत असतो. मग मनात विचार येणे स्वाभाविक आहे ही की, आपण नेमके कोणत्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये येतो?
पण मुळात हा देखील प्रश्न असू शकत नाही.
चिंतनाचा विषय असेलच तर तो हा की, ज्या क्षणी आपल्याला उमगले की, आपण अमुक एका प्रकारच्या व्यक्ती मध्ये मोडतो आणि त्यानंतर
आपण आपला स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करतो का ?
दरवर्षी नोकरी, व्यवसायात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ व्हावी, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. नव्हे ते रास्तही आहे.
पण याच ठिकाणी, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी
आपल्या प्रगल्भतेमधे वाढ झाली का? आणि आपण आपला स्तर उंचावून पुढच्या प्रकारच्या
व्यक्तींमध्ये गेलो का?
हा सदैव आत्मचिंतनाची राहिलेला विषय आहे...
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
९५९५९६९९८९
1 comment:
कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे.
Post a Comment