कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी नेहमीच जात असतो. जिथे जे साधन उपलब्ध असेल त्याने प्रवास करावा लागतो, बस, रेल्वे, जीप इ. तसा त्या दिवशी बसने प्रवास करीत होतो. गाडीत गर्दी नव्हती. माझ्या शेजारील सीट रिकामी होती.
बस एका गावाला थांबली. काही बसमध्ये प्रवासी चढले. माझ्या शेजारील सीटवर एक आजोबा येऊन बसले. आणि बसत असताना नकळत त्यांचा पाय माझ्या पायाला लागला. तसे आजोबा लगेच दोन्ही हात माझ्या गुडघ्याला लावून पाया पडले. मी अत्यंत खजील झालो.
दुसऱ्याला पायाला पाय लागल्यावर 'पाया पडणे' हे माझ्यासाठी नवीन नव्हते. पण 'साठी' ओलांडलेल्या व्यक्तीने पाया पडणे, हे मुळीच अपेक्षित नव्हते. मी आजोबांना म्हणालो, "आजोबा, तुम्हाला मी नातवा प्रमाणे आहे, माझ्या उगाच पाया पडलात." त्यावर आजोबा म्हणाले, "पोरा, असं न करून कसं चालल, ही आपली रीत हाय."
खूप समाधान वाटले. अशा व्यक्ती मुळेच संस्कृती टिकून आहे. प्रत्यक्षात जीवनात अशा गोष्टी करणारी पिढी आजही अस्तित्वात आहे, ही गोष्ट पुढच्या पिढीसाठी 'एक आदर्शच' नव्हे तर 'आशीर्वाद'ही आहे. अशा थोरामोठ्या मंडळींनी दिलेल्या अनुभवामुळेच अशा गोष्टी आपणही त्या आचरणात आणण्याची दृष्टी मिळत असते.
परंतु कधीकधी नव्या पिढीकडून आपण आता वेगळ्या संस्कृतीकडे जात आहोत, असे वाटायला लागले आहे. कारण असेच एकदा एका सार्वजनिक ठिकाणी बसलो असताना एक किशोरवयीन मुलगा शेजारी येऊन बसला. नि नकळत त्याचा पाय माझ्या पायाला लागला. आता प्रतिक्रिया साठी मी वाट पाहत होतो. तसा तो मुलगा म्हणाला, "सॉरी हं काका." आणि असे म्हणून चालला गेला.
'प्रत्यक्ष पाया पडणे' वयस्कर व्यक्तींकडून ते 'सॉरी' एका किशोरवयीन मुलांकडून या बदलत चाललेल्या संस्कृतीचा प्रवास मी अनुभवत होतो. 'सॉरी पिढी'ला नाव ठेवता येणार नाही. उपदेश देता येणार नाही. हे मला पक्के जाणवले.
पण पाय लागल्यावर थेट पाया पडणाऱ्या पिढीची या नव्या पिढीची कुठेतरी गाठ घालून द्यावी लागणार आहे. आणि ही वर्तमान पिढीची जबाबदारी आहे, हे मात्र उमगले.
कारण त्या आजोबांचे वाक्य सतत माझ्या कानात घुमत होते. 'ही आपली रीत आहे. सोडून कशी चालेल...'
7 comments:
खुपघ छान.आपल्या अशा कथा पालक व पाल्य -नविध पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
वा छानच लेख हे संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे सद्य परिस्थितीत गरजेचं आहे.
Atishay utkrushta ha lekh prapt paristit yogya ahecase mala vayte sanskar kashala mhantat he ajkalchya tarun poransathi he vachne upyukt tharen mi jastit jast lokana forward karel
Atishay utkrushta ha lekh prapt paristit yogya ahecase mala vayte sanskar kashala mhantat he ajkalchya tarun poransathi he vachne upyukt tharen mi jastit jast lokana forward karel
Bhari.khupch Chan. Kharach kiti Chan lihita Hemantji tumhi
व्यक्त होणं आवश्यक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता गरजेचे सुद्धा आहे..😊
सर्वांना खूप खूप धन्यवाद
कृपया प्रतिक्रिया लिहीत असताना आपले नाव देखील अवश्य नमुद
Post a Comment