Sunday, 10 April 2022

माघारी होणारी चर्चा

 


कुणा एका महान संतांचे वचन आहे, 'तीच व्यक्ती सर्वोत्तम जिच्या माघारी देखील तिच्याविषयी चांगलेच बोलले जाते'. गीतेतील 'उत्तम पुरुषा'ची   लक्षणे सांगितली आहेत बहुदा त्याचे हे वचन म्हणजे अगदी प्रत्येक सांसारीकासाठीचे अगदी साध्या भाषेत   मांडलेले सर्वोत्तम तत्त्वज्ञान आहेपण मग विचार येतोहे वचन संतांसाठी सामान्य असेल पण सामान्यांसाठी असे राहणेवागणे जरा दुर्मिळचतरीदेखील हे वचन सामान्य नागरिकांसाठी तर सांगितले गेले आहे.

'सज्जनहा शब्द बऱ्यापैकी रुढ झालेला आहेपण त्यामागे अशी पार्श्वभूमी असेल अशी कल्पना   करण्यास मन तितकेसे तयार होत नाहीकारण एक तर 'दोष नाहीअशी व्यक्ती सापडणे अशक्यआणि  त्यातल्या त्यात 'दोषांवर चर्चा होणार नाही', ही अपेक्षा देखील चुकीचीअर्थात व्यक्तीच्या दोषांवर माघारी चर्चा होणे स्वाभाविकच.

परंतु इथे 'माघारी होणारी चर्चाकेवळ व्यक्तीच्या दोषांवर हा विषय अपेक्षित नाहीतर त्या व्यक्तीने  जे नकळतपणे आपल्याला दिलेले दुःख असते त्यावर इतरांच्या समोर त्या 'व्यक्ती विषयी होणारी चर्चाहे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे.

खरेतर मराठीत त्याकरिता अत्यंत सुंदर असा शब्द आहे - 'उखाल्या पाखाल्या'.

मनावर झालेले आघात अत्यंत क्लेशकारक असतातचएक तर ते दिसत नाहीत आणि कदाचित याच  कारणामुळे ते अशा पद्धतीने मांडले जातात  व्यक्त केले जातातज्यामुळे देखील होणारी हानी भरून   निघणारी नसते.

पण परिणामांचा फारसा विचार  करता ही चर्चा करणे फार महत्त्वाचे आहेअसे वाटून ती सुरू राहतेठेवली जातेआणि नकळत दुःख अधिक वाढत जाते.

माघारी होणाऱ्या चर्चा मागे त्या व्यक्तीने आपल्याला दिलेला त्रासहे दुःख मोठे असतेचपण ते मनात  अक्षरशः साठवून ठेवले जातेते सोडून दिले जात नाहीमोकळी वाट करून दिली जात नाहीआणि जेव्हा  मोकळी वाट करून दिली जाते ती नेमकी दुसऱ्या इतर कोणत्यातरी व्यक्तीच्या समोर.

परंतु या ठिकाणी एक मेख आहेज्या व्यक्ती समोर आपण ते दुःख व्यक्त करत असतोत्या व्यक्तीला तसा अनुभवत्रास त्या त्रास देणाऱ्या व्यक्ती कडून झालेला असेलच असे नाहीअर्थात दुःखाचा प्रसंगती   घटना व्यक्तीसापेक्ष असतेअर्थात त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव तसा असेलही असे ठामपणे सांगणे   चुकीचेपरंतु ते केले जातेआपल्या मनातील 'खदखदइतरांसमोर मांडली जाते.

आणि कधी कधी ती तर अत्यंत रंगवून दाखविले जातेया सगळ्या प्रकारात हा देखील उद्देश असतो कीआपल्याला स्वतःला देखील सहानुभूती मिळवायची असते.

पण दुःख इथे संपत नाही तर ते अधिक वाढत जातेकिंबहुना ते आपण स्वतःहून द्विगुणित करत   असतोआणि कदाचित ज्या व्यक्तीला आपण ते सगळे ऐकवले त्याच्या मनात देखील ते खूप खोलवर फसते.

खरेतर 'मोक्षप्राप्ती', 'स्वर्गप्राप्तीही मानवी जीवनाचे अंतिम ध्येये असतीलहीपण ती मृत्यूनंतरचीअर्थात ती मिळावी यासाठी   सगळेच प्रयत्न करणारपण ती मिळाली का नाहीहे कधीच कोणाला सांगता येत नाहीम्हणूनच जिवंतपणाचे ध्येय लक्षात घेणे महत्त्वाचेआणि कदाचित ते असेल तर ते एक मात्र म्हणजे 'निर्भेळ आनंद'. 

आणि हा असा 'निर्भेळ आनंदमिळवायचा असेलतर नात्यात गोडवा निर्माण करावा लागणारतरच तो संपूर्ण जीवनात पसरेलआणि मग स्वाभाविकच ज्याला हे प्रेमळ नातं निर्माण व्हावं असं वाटतं त्याला ते   दुःख देखील विसरावे लागणारतो कटू अनुभव सोडून द्यावा लागणारत्याची इतरांच्या समोर केली जाणारी  अर्थात माघारी होणारी चर्चा सोडावी लागणार.

परंतु सुखापेक्षा मनुष्याला दुःख कुरवाळायला अधिक अधिक आवडतंआठवून पहाएखाद्या छानशा विनोदावर आपण पहिल्यांदा अगदी खळखळून हसतोपण दुसऱ्यांदातिसऱ्यांदा आपण त्यालाच 'रटाळवाणाम्हणतोपण हेच दुःखाच्या बाबतीत मात्र होत नाही!

म्हणून अशा प्रसंगात परत एकदा 'संत वचनचकामाला येतंसमर्थांचे वचन आहे, 'मना बोलणे नीच सोशीत जावे'. किंवा शारदामातांनी देखील अगदी सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे, 'प्रेमात सदैव नमतं घ्यावं म्हणजे नातं टिकतं.' अर्थात कोणत्याही नात्यात माघार घ्यावी पण माघारी चर्चा करू नये.

शिवाय अजून एक गोष्ट महत्त्वाची आपल्या मनातील दुःख मोकळे करायचे झाल्यास ते थेट त्याच व्यक्ती जवळ केले जीने आपल्याला त्रास दिला आहेतरबहुदा अशा वागण्याने आपल्या मनातील कटुता वाढणार नाहीआणि नेमकेपणाने त्या व्यक्तीलाही सुधारण्याची संधी दिल्यासारखे होईल...


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...