मी भारावलेल्या वातावरणात कविता शब्दबद्ध करत होतो
तितक्यात ती अत्यंत साधेपणांत
परंतु तिच्या मोहक रूपांत समोर प्रकट झाली
म्हणालो, “तू इतक्या लवकर का आलीस”
स्मितहास्यकरत ती तशीच मला भाळत उभी राहिली
मी परत पुढे म्हणालो,
“तुला अजुन मी पूर्ण शब्दबद्ध केले नाही.
तू नंतर ये ना!”
“वेडा कुठला”, ती म्हणाली,
“ मी तुझी कविता नाही,”
“मग”, मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिलो
ती उत्तरली,
“मी तुझी अभिधा आहे…”
No comments:
Post a Comment