Sunday, 28 April 2019

प्रगल्भता



एकदा कर्तव्य प्रेमाला म्हणाले, “श्रेयासापेक्षा मी प्रेयासाला अधिक महत्व देतो. कठोरता हा माझा स्वभाव असला तरी, माझ्यातील समर्पण मी तुझ्याशिवाय नाही पूर्ण करू शकत.”


उत्तरादाखल प्रेम म्हणाले, “ या तुझ्या स्वाभावामुळेच मला अतृप्त राहावसं वाटतं. माझी अगतिकता थिटी पडते तुझ्या अस्तित्वापुढे.”

“खरं आहे”, कर्तव्य म्हणाले, “सौंदर्य ही देहाची कमी आणि दृष्टीची अधिक अवस्था आहे. हे ज्यांना उमगतं त्यांनी प्रेम दृष्टीमधे कमी आणि हृदयात अधिक जपलेलं असतं.”

कर्तव्याची मृदुल तरलता पाहून प्रेम म्हणाले, “सर्थाकतेच्या प्रचितीचा ध्यास, अनुभूतीची आस आणि अभिव्यक्तीचा प्रवास, हे कर्तव्या तो तुझ्यामुळेच तर पूर्ण होतो. मोल आणि मूल्य यातील सूक्ष्म अंतर जो जपतो तो तुलाच तर जगतो.”

“जगण्यातील आनंदाची ही अवस्था मुळातच पूर्णत: विद्यमान आहे. आणि हे प्रेमा, या आनंदाला कर्तव्याच्या कठोरतेतून प्रेमाची झालर देऊन तूच तर ती पूर्ण करतो”, कर्तव्य म्हणाले.

दोनही श्रेयासांचा प्रेयस संवाद जीवन ऐकत होते आणि प्रगल्भतेला अभिवादन करत होते.


©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९




2 comments:

Manoj perkar said...

Very nice

Unknown said...

कर्तव्याने घडतो माणुस ,माणुस पुरुषार्था , छान लेख

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...