Sunday, 27 November 2022

एकात्मता मंत्र - स्वैर मराठी भावानुवाद


झाले पुराणकाळी

ऋषी मंत्रद्रष्टे अनेक

संबोधले तयांनी 

भगवंतास सुरेख


यम, मातरीश्वान, इंद्र आणि

संबोधीले वेदांती ब्रह्मपाणी

तो तर आहे जगन्नियंता

कधी कुमारस्वामी कधी शास्ता


बौद्ध म्हणती 'बुद्ध' जयांस

संबोधती 'अर्हन' जैन तयांस

निनादती शिखसंत 'सत् श्री अकाल' करोनी

तो स्वामी, तो पिता, तो ची जननी


तो ची गा परमात्मा

एकची अद्वितीय जाणा...


संगीत - डॉ.चारुदत्त देशपांडे

अनुवादक - हेमंत पोहनेरकर

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...