तो अभिनेता. ती अभिनेत्री. दोघांनी काही चित्रपटांमध्ये सोबत काम केले. स्वभाविकच प्रेम निर्माण झाले. प्रेम विवाहदेखील झाला.
पण नंतर नंतर तो चिंताक्रांत व्हायला लागला. नैराश्य, वैफल्य हा त्याचा नित्याचाच विषय झाला होता.
आणि अशा विचारातून त्यांने स्वतःला एकेदिवशी संपवून टाकलं.
समाज माध्यमात चर्चेला उधाण आलं. अनेकांनी त्याच्या मृत्यूचे भांडवल करायचाही प्रयत्न केला.
पण ती शांत होती. तिने कोणालाही कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.
कारण तिला त्याच्या सायकॅट्रिस्ट सांगितलं होतं, त्याला अत्यंत दुर्मिळ असा 'ल्यूपस' आजार झाला होता...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
No comments:
Post a Comment