Sunday, 9 August 2020

साहित्यीकाचा मृत्यू

एका सुप्रसिद्ध साहित्यीकाच्या अंत्यसंस्कार करिता शहरातील सगळे सारस्वत जमले होते. त्यांना श्रद्धांजली वाहत असताना प्रत्येक जण त्यांच्या प्रचंड मोठ्या साहित्यसंपदेचे गुणगान करीत होते.

प्रतिभावंत, ज्ञानवंत, गुणवंत, किर्तीवंत, इत्यादी विशेषणे तसेच अनेक अलंकार आणि दृष्टांतांनी त्यांच्यावर शब्द सुमने वाहत होते.

प्रत्यक्षात उपस्थितांना असे भासत होते की एव्हाना शब्दांची चिता झाली आहे. आणि ते शब्द त्या महान साहित्यीकाला आता स्वत:त सामावून घेणार आहेत.

पण या अंतिम शब्द यात्रेत त्यांच्या चिरंजीवांचा सहभाग नव्हता. त्यांना त्या महान साहित्यीकाचे एकच साहित्य वाचायची घाई झाली होती. आणि ते म्हणजे त्यांचे 'मृत्युपत्र'.

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...