Sunday, 9 January 2022

परभणी-नांदेड-परभणी



अगदी धावत पळत जाऊन त्याने रेल्वेचे तिकीट काढले. नंदिग्राम उभी होतीच. पण प्रचंड गर्दीमुळे तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत रेल्वे निघाली. अगदी डोळ्यासमोरून रेल्वे जात होती पण तिने वेग धरल्यामुळे त्याने डब्यात शिरायचे टाळले.

तसाच उलटा फिरला. लगोलग बाहेर निघाला. कारण आता परभणीला परत जाण्याकरिता देवगिरी दीड तासानंतर होती. तेवढ्या वेळात जर बस मिळाली तर घरी पोहचु, म्हणून तो रेल्वे स्टेशन बाहेर आला.

आणि योग चांगलाच होता. तो जसा बाहेर आला तशी परभणी-नांदेड-परभणी पाटी असलेली लालपरी अर्थात एसटी येतच होती. लगेच बस मिळाल्यामुळे त्याला आता रेल्वे चुकल्याचे दुःख नाही राहिले.

तो परभणीहून पहाटेच नांदेडला काही वैयक्तिक कामानिमित्त निघाला होता. शिवाय काही मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या भेटी घ्यायच्या होत्या. आणि रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत पोहोचू, असा त्याचा बेत होता. तसे पाहता देवगिरी मिळाली असती तरी चालले असते. पण मग दीड तास काय करायचे आणि कामही आटोपले होते म्हणून त्याने थोडी धावपळ केली. 

या विचारात दहा-पंधरा मिनिटे गेली असतील. तोपर्यंत बस नांदेड बाहेर पडली होती. बाहेरची हवा लागली तसे त्याला झोप लागली. दिवसभराचा थकवा देखील होता. त्याला जाग आली तेव्हा वसमत आले होते. कदाचित बस थांबली नसती तर तो थेट परभणीत उठला असता.

एव्हाना प्रवासी बसमध्ये चढत होते. फारशी गर्दी नव्हती त्यामुळे येणारा एक एक प्रवासी दिसत होता. आणि बसही भरपूर रिकामी होती. म्हणून जो तो खिडकीची जागा पकडून बसत होता. त्याने एकवार सगळ्या बस मध्ये दृष्टी फिरवली. एकही ओळखीची व्यक्ती नाही! त्याला आश्चर्य वाटले.

आपले सारे आयुष्य याच मार्गावर आहे जात आहे, नि प्रवासात ओळखीचे कोणी भेटले नाही! त्याला थोडे वाईट वाटले. बसही निघाली. आणि पुढच्या थांब्यावर हात दाखवून कुणीतरी बसमध्ये चढले. तोंड ओळख आहे असे त्याला वाटले. आणि त्याने त्या गृहस्थांना हाक मारुन जवळ बसण्यास बोलवले.

ते गृहस्थ देखील त्याच्याजवळ येऊन बसले. आणि मग गप्पा सुरु झाल्या. अर्थातच सुरुवात नावांपासून झाली. नि मग पुढे ओळखी निघत गेल्या.  परभणी ते नांदेड मधल्या सगळ्या जागा शिवाजीनगर गार्डन, पारदेश्वर मंदिर, दत्तधाम इथपासून ते गोवर्धनघाट, नगीनाघाट, गुरुद्वारा, वजीराबाद मार्केट, तरोडानाका इत्यादी आणि त्यांच्यावरच्या आठवणी, बालपणापासून ते नोकरी पर्यंतचा प्रवास. या परभणी-नांदेड-परभणी प्रवासामध्ये अगदी दोघांनीही आठवणी भरभरून काढल्या.

वेळ कसा गेला ते दोघांनाही कळले नाही. एक तास उलटून गेला. आता परभणी आले होते. त्याला पुढच्या थांब्यावर उतरायचे होते. म्हणून त्यांने त्या गृहस्थांचा निरोप घेतला. तेवढ्यात निघता निघता ते म्हणाले, "बघाना आयुष्य किती छान आहे. एक तर तसे पाहता आपली केवळ तोंड ओळख. पण आपल्याला गप्पा मारायला कोणताही वैचारिक, राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक समस्यांच्या विषयाची गरजच भासली नाही. केवळ आपल्या गावाकडच्या आठवणी पुरेशा होत्या."

त्यांनेही स्मित हास्य  त्यांना मूक संमती दिली. आणि समाधानाने खाली उतरला. कारण तीच भावना त्याची ही होती, म्हणूनच परभणी-नांदेड-परभणी या प्रवासात कुणीतरी सोबती मिळाल्याचे त्याला समाधान होते....


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

20 comments:

Unknown said...

सुन्दर अनुभव, खुप छान

Unknown said...

अगदी हाच विचार काल माझ्या मनात आला
सोलापुरात काल एका शेतात हुरडा पार्टी ला गेलो होतो
दिवसभर होतो तिथे
ऍग्रो टुरिझम च्या नावाखाली अश्या पार्ट्या चं पेव फुटलं आहे अलीकडे
तर झालं असं की मला राहुन राहून वाटत होतं की परभणीच्या शेतांमध्ये काहि काही लागत नव्हतं
दिवस दिवस ह्या वेगवेगळ्या शेतांत फिरायचो ते ही सोबत पैसे अथवा कोणत्याही चीजवस्तू न घेता सोबत असायचे ते फक्त मित्र जिवाला जीव देणारे मनसोक्त गप्पांचा फड जमविणारे
गोष्टीवेल्हाळ माणसाला एकटा प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षा च आहे मग तो प्रवास जीवनाचा असो वा नांदेड परभणी चा का असेना

कांचन said...

छान

Nagesh said...

वास्तव 👌🌹

Dr Jayant Baride said...

माणसाला माणसे अशीच भेटतात, झकास

Unknown said...

मस्तच...अगदी सहज लिखाण...आपलाच अनुभव वाटला....

प्रविण said...

खुपच छान हेमंतजी

Unknown said...

Chan !!!!
Abhinandan

Unknown said...

Sunder lihile ahe

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद,नितीन
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद, नागेशजी
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद, सर
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद, प्रविणजी
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

Virag Pohnerkar said...

Khup chan

Anonymous said...

छानच

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...