Sunday, 5 December 2021

लाशीन मठातील खीर


मराठीत वाक्प्रचारांचं प्रचंड मोठं भांडार आहे. अगदीच दोन-तीन शब्दाने तयार होणारे वाक्प्रचार संपूर्ण विषय अत्यंत समर्पकपणे मांडतात.

समोरील व्यक्तीपर्यंत तो विषय थेट पोहोचतो. पण ही केवळ शब्दांचीच किमया नाही. कारण अनेक वाक्प्रचार हे त्या त्या स्थानिक जीवनमानामुळे देखील तयार होत असतात. एक प्रकारे तत्कालीन जनजीवन, परंपरा, पद्धती यांचा देखील या सर्वातून परिचय होत असतो.

शिवाय अशा जर काही वाक्प्रचारांतून स्थानिक समृद्धी प्रकट होत असेल तर ती गोष्ट सदैव अभिमानाची असते. 

तीच गोष्ट 'लाशीन मठातील खीर' या  वाक्प्रचारा संबंधीची आहे.

आज नेमकेपणाने सांगता येत नाही की नेमक्या किती वर्षांपूर्वी 'लाशीन मठातील खीर' हा वाक्प्रचार जनमाणसांत आला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील एका प्राचीन मठाशी संबंधित हा वाक्प्रचार आहे. तो मठ म्हणजे सिद्धेश्वर मठ किंवा त्याला लाशीन मठ असेही संबोधतात.

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मंदिरांमध्ये अन्नछत्रालय चालायचे. त्याच धर्तीवर लाशीन मठात देखील सण-समारंभाच्या दिवशी, सर्व उत्सवांना तसेच दैनिक तत्वावर मठातील देवतेला महादेव 'सिद्धेश्वराला' खिरीचा नैवेद्य असायचा. आणि मग स्वाभाविकच मठात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला किंवा या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला ही प्रसादाची खीर अर्थातच विनामूल्य आणि पोटभर असायची.

स्वाभाविकच प्रत्येक जण तृप्त होऊन जात असणार. संपूर्ण जेवण जेवल्यानंतर तृप्तीचा ढेकर येत असतोच. पण दुधाच्या खीरी मुळे पूर्णान्न मिळाल्याचे समाधान असते. हा अनुभव अज्ञात काळापासून अनेकांनी घेतलेला आहे.

पण काळाच्या ओघात जनमाणसांत मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या लाशीन मठातील खीरीचा दाखला वाक्प्रचारांतून दिला जाऊ लागला.

लाशीन मठातील प्रत्येक भक्ताला, वाटसरूला खीर मोफत होती. म्हणून कोणी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही गोष्ट विनासायास स्वतःच्या उपयोगाकरिता अगदी मोफत मागत असेल अर्थात ती व्यक्ती कुठलेही कष्ट न घेता केवळ मागणी करत असेल तर त्या व्यक्तीला 'ती गोष्ट म्हणजे काय लाशीन मठातील खीर आहे का?' असे उपहासाने विचारले जायचे.

वसमत तालुक्यात हा वाक्प्रचार आजही रूढ आहे. एका बाजूने मागणाऱ्या व्यक्तीला नकळतपणे त्याची कष्ट न करण्याच्या स्वभावाची जाणीव करून देणारा 'लाशीन मठातील खीर' हा वाक्प्रचार अगदी चपखलपणे बसतो. तर सोबतच लाशीन मठाची दानत किती समृद्ध होती याचे देखील दर्शन घडते.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

13 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य नोंदवावे.

Kshitija said...

अतिशय स्तुत्य उपक्रम आणि नावीन्यपूर्ण माहिती.खूप सुंदर.

Unknown said...

Mast👌👌

Unknown said...

Hemant ji this is a unique initiative. This 'Abhidha' brings us a unique smile in this digital world connecting with our age old world of reading. Pl continue this initiative.

Nagesh said...

खूप समृद्ध व अतिशय समर्पक शब्दांत आपल्या वसुमतीनगरी तीळ वाक्यप्रचाराचे विश्लेषण......
वाह, हेमंतराव खुपच छान👌🏼🌹

Nagesh said...

* तील 👍

हेमंत पोहनेरकर said...

मनःपूर्वक धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

मनःपूर्वक धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

मनःपूर्वक धन्यवाद, नागेशजी
🙏🏻🙏🏻🙏🏻

हेमंत पोहनेरकर said...

मनःपूर्वक धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻.

कृपया आपले नाव अवश्य लिहावे

Unknown said...

खूप छान

Unknown said...

हेमंत तू तर मोठा लेखक झालास अभिनंदन��

Manoj said...

धन्यवाद... अगदी सखोल माहिती दिल्याबद्दल. आभारी आहोत 🙏🙏🙏

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...