त्याच्या इटुकल्या लाडो सोबत तो 'ट्रॅफिक सिग्नल' खेळ खेळत होता.
राज्यं त्याच्यावर आले.
तिने पाळायला सुरुवात केली.
तो, "रेड सिग्नल", म्हणाला.
परंतु ती थांबली नाही.
तो तिला थांबवत म्हणाला,
"'रेड सिग्नल' लागल्यावर थांबायचं असतं ना!"
त्यावर त्याची इटुकली लाडो म्हणाली,
"पण कधी कधी तू पण गाडी चालवताना रेड सिग्नल लागल्यावर थांबत नाहीस. तसंच मी पण एखाद्यावेळेस केलेतर चालेल ना!"
No comments:
Post a Comment