अतिलघुकथा
एकदा एका नवोदित प्राध्यापकाने वर्गात एका कॉलेजकुमाराला विचारले,
"तुझा आवडता विषय कोणता?"
"रॅगिंग", तो उत्तराला.
वर्गात एकच हशा पिकाला.
मग शांतपणे त्या प्राध्यापकाने त्या कॉलेजकुमाराची रॅगिंग घेतली.
आता कुणीही हसले नाही.
त्यावर तो प्राध्यपक म्हणाला,
"बहुदा माझी अपॉइंटमेंट तुमचा 'आवडीचे विषय' बदलण्यासाठीच झाली आहे."
2 comments:
गुरू गुरूच असतो
प्रणाम....
Post a Comment